(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha : 'ताकाला जाऊन भांडं कशाला लपवू', सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपचे प्रमोद जठार उत्सुक, राणे-सामंत यांच्यानंतर इच्छुकांच्या यादीत वाढ
Pramod Jathar On Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : महायुतीने संधी दिल्यास आपण सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून दिल्लीत जायला तयार असल्याचं सूचक वक्तव्य भाजपचे प्रमोद जठार यांनी केलं आहे.
सिंधुदुर्ग : कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) इच्छुकांच्या यादीत वाढच होत असून आता भाजपच्या प्रमोद जठारांनीही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. ताकाला जाऊन भांड कशाला लपवू असं म्हणत महायुतीने संधी दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढू असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्या निलेश राणे, शिवसेना शिंदे गटाचे रविंद्र सामंत यांच्यानंतर आता प्रमोद जठारांच्या नावाचीही इच्छुकांच्या यादीत भर पडली आहे.
सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीसाठी प्रमोद जठार इछुक
ताकाला जाताना भांड कशाला लपवायचे? असं म्हणत महायुतीने विश्वास दाखवल्यास मी दिल्लीत निवडून जाईन असं वक्तव्य भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी केलं आहे. मागची दोन टर्म भाजपने विनायक राऊत यांना अडीच लाख मते देऊन खासदार केलं.मात्र विनायक राऊत यांनी एकही रोजगार किंवा प्रकल्प आणला नाही, विनायक राऊत यांनी मुंबईतील खंबाठा प्रकल्पाचे वाटोळे केले अशी टीकाही त्यानी केली.
विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे गटाचा खंबाटा केला, आता कोकणचा खंबाटा होऊ नये म्हणून विनायक राऊत यांना हटवावे लागणार असं प्रमोद जठार म्हणाले. रत्नागिरी- सिंधुदु्र्गमध्ये कमळाचा खासदार निवडून आला तर आम्ही दोन लाख रोजगार मिळवून देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं. कोकणात ग्रीन फिल्ड प्रकल्प झाल्यास आर्थिक आणि पर्यटन राजधानीला जोडणारा कोकण भविष्यात देशाची आर्थिक राजधानी होईल असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला.
शिंदे गटाचे किरण सामंतही लोकसभेसाठी उत्सुक
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी आपण लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुक असल्याचं या आधीच स्पष्ट केलंय. तसे संकेतही राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिलेत. लांजा येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्या नावालाच दुजोरा दिला होता. 'माझे शासकीय निवासस्थान मुंबईत आहे. पण आपले शासकीय निवासस्थान दिल्लीत असले पाहिजे' असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आपले मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत लोकसभा उमेदवारीबाबत प्रकारे सुतोवाच केले होते.
निलेश राणे लोकसभेसाठी उत्सुक?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी एक ट्विट करत आपण अचानक राजकारणातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू होत्या. राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे निलेश राणे बाजूला होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय 24 तासांमध्ये मागे घेतला होता.
ही बातमी वाचा: