एक्स्प्लोर
नारायण राणेंना काँग्रेसचा मोठा धक्का, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
नारायण राणेंना काँग्रेस पक्षानं मोठा धक्का दिला आहे. राणे समर्थक असलेल्या जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन, पक्षाचे निष्ठावंत विकास सावंत यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई : भाजपच्या वाटेवर असणाऱ्या नारायण राणेंना काँग्रेस पक्षानं मोठा धक्का दिला आहे. राणे समर्थक असलेल्या जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन, पक्षाचे निष्ठावंत विकास सावंत यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोकणात काँग्रेसचे सर्वेसर्वा आपणच आहोत, अशा थाटात सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यात वावरणाऱ्या नारायण राणेंना काँग्रेसने जोरदार झटका दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार, राणे समर्थक जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारणी बरखास्त करून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विकास सावंत यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात हुसैन दलवाईंनी घेतलेली काँग्रेसची सभाही उळधून लावण्याचा प्रयत्न राणे समर्थकांनी केला होता. तसेच हुसैन दलवाईंचा आणि सिंधुदुर्ग काँग्रेसशी काय संबंध? असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला होता. तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते आपल्य मागे असल्याचा दावाही राणेंनी यावेळी केला होता.
मात्र, आता राणे समर्थकांनी भरलेली जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन पक्षानं राणेंना सूचक इशारा दिला आहे. तसेच जिल्हा काँग्रेसची जबाबदारी निष्ठावंत कार्यकर्ते विकास सावंत यांच्यावर सोपवून राणेंना मोठा दणका दिला आहे.
दरम्यान, काँग्रेस कमिटीच्या निर्णयानंतर जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, राणे यांनी अद्याप काँग्रेस पक्ष सोडलेला नसताना त्यांना विश्वासात न घेता दत्ता सामंत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्यात आले. यामुळे निष्ठावंत आणि बाहेरुन आलेले असा अंतर्गत संघर्ष जिल्हा काँग्रेसमध्ये तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या
सिंधुदुर्गातील काँग्रेस बैठकीवरुन नारायण राणे आणि हुसेन दलवाई यांच्यात मतभेद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement