हिंदू धर्मावर वेडीवाकडी टीका करून आपण खूप पुरोगामी आहोत, असं राज ठाकरेंना वाटत असेल तर...; महंत सुधीरदास महाराजांची संतप्त प्रतिक्रिया
Sudhirdas Maharaj on Raj Thackeray : आज 65 कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केलंय. त्यांच्या श्रध्देचा राज ठाकरे अपमान करित असल्याची टीका आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी केली आहे.

Mahant Sudhirdas Maharaj on Raj Thackeray : राज ठाकरे साहेबांनी ठाकरे भाषेमध्ये सिंहस्थ कुंभमेळावरती, गंगेवरती जी काही टीका केलीय, प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरे भाषेत कशाचाही समाचार घेतला तर आपण फार मोठे तत्ववेते झालो. स्तुलतीर्थ आणि सूक्ष्म तीर्थ असे दोन तीर्थाचे प्रकार आहे. किंबहुना तीर्थांची परीक्षा करू नये, गंगेची तर त्याहून परीक्षा करू नये. आणि बहुधा त्यांचे जे सहकारी यांच्याकडे पाणी घेऊन गेले ती चुकीची वेळ असेल. त्यामुळे त्यांनी गंगेचं पाणी नाकारला असेल. अशा शब्दात निर्वाणी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज (Mahant sudhirdas Maharaj) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील (Kumbh Mela 2025) पवित्र स्नानाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन महंत सुधीरदास महाराज चांगलेच आक्रमक झाले आहेत.
65 कोटी लोकांच्या श्रध्देचा राज ठाकरेंकडून अपमान- महंत सुधीरदास महाराज
पुढे ते म्हणाले की, मला असं वाटतंय की धर्माच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला आपण हिंदू धर्मावरती वेडीवाकडी टीका करतो आणि आपण खूप पुरोगामी आहोत, असं राज ठाकरेंना जर वाटत असेल तर ते चुकीचे आहे. आज 65 कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केलंय. त्यांच्या श्रध्देचा राज ठाकरे अपमान करित असल्याचे ही आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज म्हणाले.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे
नुकताच करोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहेत. कुणालाही कुणाचं देणंघेणं नाही. देशात राजीव गांधी असल्यापासून मी ऐकतोय की गंगा स्वच्छ होणार. त्यानंतर राजीव कपूर यांनी चित्रपटाही काढला. लोकांना वाटलं गंगा झाली साफ. मात्र त्यात वेगळीच गंगा. किंबहुना अद्याप गंगा साफ झालेली नाही.
मध्यंतरी मुंबईत आमच्या पदाधिकाऱ्यांची मेळावा बैठक लावली होती. त्यात काही शाखेचे पदाधिकारी गैरहजर होते आणि जे गैरहजर होते त्यांची हजेरी मी घेतली. त्यावेळी प्रत्येकाला विचारलं असता त्यातला अनेकांनी आपली आपली करणं दिली. त्यातल्या बहुतांश लोकांनी कुंभमेळ्याचे कारण पुढे केले. मुळात तुम्ही पाप करताच कशाला? असा प्रश्न मी त्यांना केला. शिवाय परत आल्यावर अंघोळ केली का असं ही विचारलं. बाळा नांदगावकर ही कमंडलुमधून पाणी घेऊन आले. मी नाही पिणार पाणी वैगरे, असं मी त्यांना म्हणालो. सोशल मीडियावर माणसं-बाया अंग घासून अंघोळ करताय आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, असं म्हणत राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली आहे.
हे ही वाचा























