Shreehari Aney On Maratha Reservation: मराठ्यांना आरक्षण मिळणं शक्य आहे का?; ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे यांनी A टू Z सांगितलं!
Shreehari Aney On Maratha Reservation: मराठ्यांना आरक्षण मिळणं शक्य आहे का?, यावर एबीपी माझाशी बोलताना ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे स्पष्टीकरण दिलं आहे.

Shreehari Aney On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईतील आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं हजारोंच्या संख्येने आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन संविधानिक आहे की असंविधानिक आहे? या आंदोलनाच्या परवानग्या नेमक्या कशा आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या हातामध्ये किती अधिकार आहेत. मराठा आरक्षण जर द्यायचं असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काय भूमिका घेणे अपेक्षित आहे. यासंदर्भात ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे (Shreehari Aney On Maratha Reservation) यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळणं शक्य आहे?
मराठ्यांना आरक्षण मिळणं शक्य आहे का?, यावर एबीपी माझाशी बोलताना ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे स्पष्टीकरण दिलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेधानिक आहे, असं म्हणालायला हरकत नाही. कारण त्याचा संबंध भारताच्या संविधानाशी येतो, असं श्रीहरी अणे यांनी सांगितले. तसेच भारताच्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण देण्यात आलेला आहे. ते त्यात बसतं की नाही याचा विचार करावा लागतो. एक गोष्ट लक्षात घ्या की, संविधानामध्ये एसईबीसी नावाचा जो नवीन प्रकार आहे जो महाराष्ट्रात दहा टक्के देण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात 2024 मध्ये हा कायदा झाला. दहा टक्के ज्यादा आरक्षण दिलं ते ओबीसीच्या बाहेरच दिलेलं आहे, असं श्रीहरी अणे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आरक्षण 51% च्या पलीकडे- श्रीहरी अणे
ओबीसीच्या बाहेरच्या आरक्षणामध्ये दहा टक्के वाढ झाल्यामुळे एकूण महाराष्ट्रात आरक्षण 51% च्या पलीकडे गेले आहे. हे असंवैधानिक समजलं जातं. त्यामुळे या आरक्षणाचा बचाव करण्याकरता सरकारला भरपूर त्रास होणार आहे. सरकारने हे आरक्षण ओबीसीमधून जरी दिलं असतं, तर कदाचित 51 टक्क्यांची बाधा आली नसती. त्यामुळे एक मुद्दा 51 टक्क्यांचा आहे, आणि दुसरा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला आरक्षणाकरता कायद्यामध्ये पात्रता आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, हा असणार आहे, असं श्रीहरी अणे यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

























