सोलापूरमध्ये अर्ध्या एकर शेतात साकारली शिवरायांची प्रतिमा, तर 15 बाय 40 फुटांची भव्य रांगोळी
शिवजयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील बाळे परिसरात प्रतीक तांदळे या तरुणाने शिवाजी महाराजांची 150 फूट प्रतिमा आपल्या शेतात तयार केली आहे. शेतातील ज्वारीच्या कडब्याचा वापरून करून अर्ध्या एकर शेतात महाराजांची भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली आहे. लोकआस्था युथ फाउंडेशन यांच्या संयोजनाने जवळपास दहा दिवसात ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.
![सोलापूरमध्ये अर्ध्या एकर शेतात साकारली शिवरायांची प्रतिमा, तर 15 बाय 40 फुटांची भव्य रांगोळी Shivjayanti 2021 solapur rangoli of chhatrapati shivaji maharaj in solapur सोलापूरमध्ये अर्ध्या एकर शेतात साकारली शिवरायांची प्रतिमा, तर 15 बाय 40 फुटांची भव्य रांगोळी](https://vodcdn.abplive.in/2021/02/2cd34b3c3d27bb90ecb8650ea66b20b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
शिवजयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील बाळे परिसरात प्रतीक तांदळे या तरुणाने शिवाजी महाराजांची 150 फूट प्रतिमा आपल्या शेतात तयार केली आहे. शेतातील ज्वारीच्या कडब्याचा वापरून करून अर्ध्या एकर शेतात महाराजांची भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली आहे. लोकआस्था युथ फाउंडेशन यांच्या संयोजनाने जवळपास दहा दिवसात ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.
दुसरीकडे सोलापुरातील मुस्लिम युवकाने देखील महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. सोलापुरातील चिरागअली सोशल फाउंडेशनचे अय्युब पठाण यांच्यावतीने दयानंद महाविद्यालयात महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. 15 फूट बाय 40 फुटांची ही रांगोळी साकारण्यात आली आहे. जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी या साठी लागल्याची माहिती अय्युब पठाण यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)