Shiv Thakare : शिव ठाकरेने उपविजेतेपदावर मानलं समाधान; म्हणाला, "अमरावती ते 'Bigg Boss 16' पर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या"
Shiv Thakare : शिव ठाकरे म्हणाला,"सलमान खान (Salman Khan) माझ्यासाठी देव आहे. अमरावती ते 'बिग बॉस 16'पर्यंतचा प्रवास खूप छान होता".
Shiv Thakare On Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला असून एमसी स्टॅन (MC Stan) या पर्वाचा विजेता ठरला आहे. तर 'आपला माणूस' शिव ठाकरेला (Shiv Thakare) उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. यावर प्रतिक्रिया देत शिव ठाकरे म्हणाला, "अमरावती ते 'बिग बॉस 16' पर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या".
शिव ठाकरे म्हणाला,"सलमान खान (Salman Khan) माझ्यासाठी देव आहे. अमरावती ते 'बिग बॉस 16' पर्यंतचा प्रवास खूप छान होता. या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या. मी विजेता झालो नसलो तरी ट्रॉफी मंडलीकडे आली आहे. माझा खास मित्र एमसी स्टॅन 'बिग बॉस 16'चा विजेता झाल्याचा मला अभिमान आहे".
View this post on Instagram
शिव ठाकरे पुढे म्हणाला,"मला प्रेक्षकांचं, चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं आहे. यासाठीच मी बिग बॉसच्या घरात गेलो होतो. प्रामाणिकपणे खेळत होतो. पण काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात असं समजून पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. आता नवीन प्रोजेक्ट देखील प्रामाणिकपणे करेन".
सोशल मीडियाच्या माध्यमातून शिव ठाकरेच्या चाहत्यांची नाराजी
शिव ठाकरे 'बिग बॉस 16' जिंकणार अशी शक्यता वर्तवली जात होती. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्या चुरशीची चढत पाहायला मिळाली. यात पुणेकर रॅपर असणाऱ्या एमसी स्टॅनने बाजी मारली आहे. त्यामुळे आता शिवचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
'आपला माणूस' शिव ठाकरे 'बिग बॉस 16' जिंकावा यासाठी चाहते वेगवेगळ्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत होते. चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी तसेच राजकारणी मंडळींनी देखील खास पोस्ट शेअर करत शिव ठाकरेला अधिकाधिक वोट करण्याचं आवाहन केलं होतं. यात महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, नवनीत राणा, अमेय खोपकर, बच्चू कडू यांचा समावेश होता. पण शिव ठाकरेला विजेतेपद न मिळाल्याने त्याचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.
संबंधित बातम्या