एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं खळबळजनक वक्तव्य
बराच गोंधळ होऊन अखेर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवत मुख्यमंत्रीपद मिळवलं. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर आता मनोहर जोशी यांनी हे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं हेच चांगलं आहे असं मला वाटतं. शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील, भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलं आहे. मात्र सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना ते मान्य नसल्याचं दिसतं आहे असं मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.
जोशी यावेळी बोलताना म्हणाले की, छोट्या मोठ्या गोष्टीवरुन झगटा करण्यापेक्षा काही गोष्टी सहन कराव्या. काही गोष्टी आपल्या आग्रहाच्या असतील त्या सांगाव्यात. एकत्र काम केलं तर दोघांच्याही फायद्याचं ठरेल. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्ताने किंवा आपला पक्ष पसरवण्याच्या दृष्टीने अशा गोष्टी घडतात. तसं सध्या शिवसेना आणि भाजपच्या बाबतीत झालं आहे. याचा अर्थ आम्ही भाजपबरोबर कधीच जाणार नाहीत असं नाही. योग्य वेळ येताच उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे मनोहर जोशी यावेळी म्हणाले.
माझ्या मते भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र राहयला हवं. मात्र सद्यस्थितीत हे दोन पक्षांना हे मान्य असावं असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या खात्यांवरून अडलं खातेवाटप, सरकार स्थापनेच्या 13 दिवसानंतरही तिढा कायम
ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यानंतर निकाल लागला तो महायुतीच्या बाजूने मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली. मुख्यमंत्री पदाच्या वादावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये घटस्फोट झाला. यानंतर बराच गोंधळ होऊन अखेर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवत मुख्यमंत्रीपद मिळवलं. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर आता मनोहर जोशी यांनी हे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीआधी महायुतीच्या बॅनरखाली भाजपा आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र लढले होते. निकालानंतर कौलही महायुतीलाच मिळाला होता. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे असा दावा केला होता. नेमकं काय म्हणाले मनोहर जोशीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement