Sharad Pawar on Shivaji Maharaj Statue : यात कसलं आलं राजकारण? तेव्हा शिवरायांनी हात कलम करण्याचे आदेश दिले होते; शरद पवारांचा हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार असल्याची घोषणा केली.
Sharad Pawar on Shivaji Maharaj Statue : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर महाराष्ट्रामध्ये रणकंदन सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठाकरे गट आणि नारायण राणे समर्थक आमने सामने आल्याने अभूतपूर्व असा संघर्ष राजकोट किल्ल्यावर घडला. या घटनेमध्ये एकमेकांना मारहाण करण्यापासूनक ते शिवीगाळ करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. या पत्रकार परिषद बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या राजकारण करत असल्याच्या आरोपावर जोरदार पलटवार केला.
यामध्ये कसलं आलं राजकारण?
शरद पवार (Sharad Pawar on Shivaji Maharaj Statue) म्हणाले की, जेव्हा एका भगिनीला त्रास देण्यात आला होता रांझण्याच्या पाटलाचे त्यावेळी शिवाजी महाराज यांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले होते. असा सक्त निर्णय निर्णय घेणाऱ्या व्यक्तीमत्वाची प्रतिकृती तयार करून समुद्रावर आणली आणि ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला. त्यामुळे तो प्रकार झाला. आता कुणी सांगत आहे की वाऱ्याचा वेग जास्त होता. त्यामुळे ज्या ठिकाणी पंतप्रधान तिथं किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार खोलवर गेला आहे. कुठं भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही. त्यामुळं शेवटी लोकांच्यामध्ये तीव्र भावना आहे. ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून उभी करावी यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करुन हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असं शरद पवार म्हणाले.
जोडे मारो आंदोलन : उद्धव ठाकरे
दरम्यान, महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चा काढला तिथे रस्ता मोदी शाह यांच्या दलालांनी अडवला. हा पुतळा पडला कसा? केसरकर जे बोलत आहेत ते संतापजनक आहे. येत्या रविवारी दुपारी वाजता हुतात्मा स्मारक हून गेट वे इंडिया पर्यंत जाणार आहोत. जोडे मारो आंदोलन आम्ही करत या सरकारचा निषेध करणार आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या