(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Positive Impact : 11 फेब्रुवारीला शनि होणार अस्त; 'या' राशींना येणार चांगले दिवस, मिळणार पुरेपूर लाभ
Shani Positive Impact On These Zodiac Signs : शनीचा कुंभ राशीत अस्त झाल्यावर काही राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत, तर काहींना नुकसान सहन करावं लागणार आहे. आता शनीचा अस्त नेमका कोणत्या राशींसाठी फलदायी ठरेल? जाणून घेऊया.
Shani Asta Positive Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्त्व आहे. सर्व ग्रह एका ठराविक काळानंतर आपली राशी बदलतात, ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. सर्व ग्रहांपैकी शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि (Shani) एका राशीत सुमारे अडीच वर्षं राहतो. शनि 2024 मध्ये त्याच्या मूळ त्रिकोण राशी, म्हणजेच कुंभ राशीत आहे. गेल्या वर्षी शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला आणि आता 2025 पर्यंत शनि कुंभ राशीतच असेल. परंतु कुंभ राशीतच मधेमधे शनीच्या हालचालीत बदल झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
शनि 11 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी कुंभ राशीत अस्त होईल. यानंतर 26 मार्चला सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी पुन्हा शनीचा कुंभ राशीत उदय होईल, त्यामुळे 38 दिवस शनि अस्त अवस्थेत राहील. त्यामुळे शनीच्या (Shani Effects) या ग्रहस्थितीचा काळ काही राशींसाठी चांगला ठरणार आहे. या 38 दिवसांच्या काळात 3 राशींच्या लोकांना सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. आता या 3 भाग्यवान राशी कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
11 फेब्रुवारीपासून शनि तुमच्या नवव्या भावात अस्त स्थितीत असेल. या काळात मिथुन राशीच्या लोकांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल. मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल, यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगलं सहकार्य मिळेल.
कर्क रास (Cancer)
शनि कर्क राशीच्या आठव्या भावात अस्त होत आहे, त्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असू शकतो. ज्यांना नोकरीत अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी येणारा काळ चांगला असेल. नोकरीतील अडचणी दूर होतील. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगल्या नफ्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात मान-सन्मान वाढेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
सिंह रास (Leo)
शनीच्या अस्ताचा तुमच्या सप्तम भावावर परिणाम होईल. अशा परिस्थितीत या काळात तुम्हाला पावलोपावली यश मिळेल. करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. कामाच्या बाबतीत तुम्हाला समाधान मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : शनि कुंभ राशीतच राहणार; 2025 पर्यंत 'या' राशी असणार भाग्यवान, प्रगतीचे दरवाजे उघडणार