एक्स्प्लोर
'दिल तो हैप्पी है जी' टीव्ही सिरियलमधील अभिनेत्रीची आत्महत्या
या क्षेत्रात येण्यासाठी तिने आपल्या आईबाबांना फार प्रयत्नपूर्वक तयार केले होते. साल 2017 मध्ये सेजल मुंबईला आली होती.तेव्हापासून ती टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होती. सेजलला मॉडेलिंगची देखील आवड होती.
मीरा रोड : 'दिल तो हैप्पी है जी' या टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिकेची अभिनेत्री सेजल शर्मा हिने आज पहाटे आपल्या राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या मित्राने मीरा रोड पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. त्याच्याशी ती उशिरापर्यंत मोबाईल वर बोलत होती. आत्महत्येवेळी तिच्या घरी तिची मैत्रीण तृप्ती पामेचा आणि तृप्तीचा मित्र आदित्य नागवंशी ही राहत होते. सेजलने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने आपल्या मृत्युला कुणालाही जबाबदार धरु नये, तसेच आपण दोन महिन्यापासून डिप्रेशनमध्ये असल्याच म्हटलं आहे.
सेजल मीरा रोड मध्ये रॉयल नेस्ट या इमारतीमध्ये राहते. सेजल आणि तिचे दोघे मित्रांनी रात्री सव्वा बारा वाजता जेवण केलं. त्यानंतर सेजलला तिच्या मित्राचा फोन आला. ती तिच्याशी बोलता बोलता बेडरूममध्ये गेली. त्यानंतर तिच्या मित्राने पहाटे साडे तीन वाजता मीरा रोड पोलिसांना फोन करून सेजलने आत्महत्या केल्याची माहिती दिली. या घटनेने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सेजलने आमिर खान, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या बरोबरही जाहिरातीत काम केलं होतं. सेजल ही मूळची राजस्थानची राहणारी होती. मीरा रोड पोलीस सध्या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.
सेजल एका मध्यमवर्गीय परिवारातून आली होती. या क्षेत्रात येण्यासाठी तिने आपल्या आईबाबांना फार प्रयत्नपूर्वक तयार केले होते. साल 2017 मध्ये सेजल मुंबईला आली होती.तेव्हापासून ती टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होती. सेजलला मॉडेलिंगची देखील आवड होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement