एक्स्प्लोर

SBI Rate Hike : एसबीआयच्या लाखो ग्राहकांना फटका, ईएमआयचा हप्ता पुन्हा वाढणार

SBI Rate Hike : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याज दरात वाढ केली असून ग्राहकांच्या खिशावर भार वाढणार आहे.

SBI Rate Hike :  देशातील सर्वात मोठी बँक SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) ने आजपासून व्याजदरात वाढ केली आहे. यावेळी बँकेने बेस रेट (SBI Base Rate Hike) आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (SBI BPLR Hike) वाढवले ​​आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन्ही दरांमध्ये तिमाही आधारावर सुधारणा करते.

BPLR मध्ये वाढ

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, दोन्ही नवे दर आजपासून, बुधवारपासून लागू झाले आहेत. बँकेने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटमध्ये 70 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.70 टक्क्यांची वाढ केली आहे. आता त्याचा नवीन दर 14.85 टक्के झाला आहे. यापूर्वी, डिसेंबर 2022 मध्ये बीपीएलआर बदलण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा दर 14.15 टक्के होता. हा दर वाढल्यानंतर बीपीएलआरशी संबंधित कर्जाचे हप्तेही वाढणार आहेत. 

मूळ दरात वाढ

बीपीएलआरसोबतच बँकेने बेस रेटमध्येही वाढ केली आहे. याचा अर्थ ज्या ग्राहकांनी एसबीआयकडून बेस रेटवर कर्ज घेतले आहे, त्यांचा ईएमआयही वाढणार आहे. त्यामुळे महागाईचे चटके सोसणाऱ्या ग्राहकांना आणखी झळ सोसावी लागणार आहे. 

या दरांवर कर्ज उपलब्ध

बीपीएलआर आणि बेस रेट हे बँकांचे जुने बेंचमार्क आहेत. या बेंचमार्कच्या आधारे कर्ज दिले गेले. आता बहुतेक बँका एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच EBLR किंवा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट म्हणजेच RLLR वर कर्ज देतात.

वर्ष 2016 च्या आधी घेतलेल्या कर्जाच्या ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे.  बेस रेट हा किमान व्याजदर, ज्यावर बँका कर्ज देतात. यापेक्षा कमी दराने कर्ज देता येत नाही. एसबीआयकडून याआधीच एमसीएलआरमध्ये 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. एसबीआयकडून या वर्षात दोनदा व्याजदरात वाढ केली गेली आहे. आरबीआयकडून मे 2022 नंतर सहाव्यांदाच रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बॅंकांची कर्ज महागली आहेत. 

पुढील महिन्यात एमपीसीची बैठक

पुढील महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक (RBI MPC Meeting) होणार आहे. त्याआधीच  SBI ने दोन्ही जुन्या बेंचमार्क दरांमध्ये वाढ केली आहे. असे मानले जात आहे की 6 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या एमपीसीच्या बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्के रेपो रेट वाढवू शकते. खरे तर या वर्षाच्या सुरुवातीपासूनच महागाईने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे व्याज दरवाढीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

सर्व बँकांची कर्जे महाग

महागाई वाढत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात (RBI Repo Rate Hike) वाढ करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत अनेक टप्प्यांत रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढवले ​​आहेत. यामुळे कर्जाचे हप्ते वाढले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget