Satara News: साताऱ्यात कोळशाच्या कारखान्यात काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार, पतीला ठेवले दुसऱ्या खोलीत डांबून
Satara News: 18 दिवसांपूर्वी महिलेवर कोळसा कारखान्याच्या मालकासह पाच जणांनी बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. महिलेच्या नवऱ्याला दुसऱ्या खोलीत डांबून ठेवले होते.
विरार : कोळसा कारखान्यात काम करणाऱ्या एका कातकरी महिलेवर सामूहिक बलात्कर केल्याची धक्कादायक घटना सातारा (Satara News) जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडली आहे. कोळसा उत्पादन करणाऱ्या मालकासह पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
पीडित महिला तिचा पती आणि पाच वर्षाची मुलगी त्या कोळसा कारखान्यातून सुखरुप सुटून रायगडमध्ये आपल्या घरी पोहचल्यावर पीडित महिलेने घडलेला प्रसंग आपल्या मामाला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेच्या मामाने तिला विरार येथे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्याकडे नेलं. त्यानंतर विवेक पंडित यांनी पाठपुरावा केल्यानंतर आज पहाटे सातारा पोलिसांनी त्या महिलेला आणि तिच्या पतीला साता-याला तक्रार दाखल करण्यास नेलं आहे.
पीडित महिला 28 वर्षांची असून तिला एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. ती कातकरी समाजातील असून रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यातील राहण्यास आहे. पीडित महिला आणि तिचा नवरा, सासू-सासरा आणि मुलं हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका कोळसा उत्पादित करणाऱ्या कारखान्यात कामाला लागले होती. कामाच्या ठिकाणी दहा हजाराचे अॅडव्हान्स त्यांनी घेतलं होतं. 18 दिवसांपूर्वी महिलेवर कोळसा कारखान्याच्या मालकासह पाच जणांनी बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. महिलेच्या नवऱ्याला दुसऱ्या खोलीत डांबून ठेवले होते. रात्री पीडित महिलेच्या नवऱ्याने महिलेची सुटका करत तेथून पळ काढला आणि थेट पंढरपूर गाठले
महिला आणि तिच्या पतीने रात्री तिच्या नवऱ्याने पाच वर्षाच्या मुलीसह ते पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून पुन्हा रायगडला आपल्या गावी आल्यानंतर त्यांनी मामाला घडलेला प्रसंग सांगितला.त्यानंतर कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर साता-याचे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कोळसा कारखान्याचा मालक बाळू शेख याला ताब्यात घेतलं. तसेच सातारा पोलिसांच्या एक टिमने पीडित महिलेला आज पहाटे 5.30 वाजता साता-याला गुन्हा दाखल करण्यासाठी घेऊन गेलेत.सातारा पोलिसांनी पीडितेचे सासू सासरे आणि दोन मुलांची कारखान्यातून सुटका केली आहे. मांडवी पोलिसांनी ही पीडित महिलेचा जबाब नोंदवला असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली आहे.
हे ही वाचा :