(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले काॅलर उडवतात, स्टेजवर नाचतात ही भाजपची शिस्त आहे का? थेट केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारताच काय म्हणाले??
सातारमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. प्रश्न विचारल्यानंतर उदयनराजे भोसले नेहमीच बिनधास्त असणारे चांगलेच धीरगंभीर झाल्याचे दिसून येत आहेत.
सातारा : भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) कधी काॅलर उडवण्यासाठी, कधी गाड्या रेस करणे तर कधी कधी खूर्चीत खूर्ची घालून बसण्यासाठी तर कधी बिनधास्त डान्स करण्यासाठी चांगलेच प्रचलित आहेत. अलीकडेच सातारमधील एका दहीहंडी कार्यक्रमात उदयनराजे भोसले स्टेजवर मुलींसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सातारा (Satara News) दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Minister Ajay Kumar Mishra on Udayanraje Bhosale) यांना प्रश्न विचारण्यात आला असता उत्तर देताना बरीच कसरत करावी लागली. सातारमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. प्रश्न विचारल्यानंतर उदयनराजे भोसले नेहमीच बिनधास्त असणारे चांगलेच धीरगंभीर झाल्याचे दिसून येत आहेत.
उदयनराजे काॅलर उडवतात, स्टेजवर नाचतात ही भाजपची शिस्त आहे का?
एका हिंदी पत्रकाराकडून पत्रकार परिषदेत मंत्री अजय मिश्रा यांना (Minister Ajay Kumar Mishra on Udayanraje Bhosale) उदयनराजे काॅलर उडवतात, स्टेजवर नाचतात ही भाजपची शिस्त आहे का? अशी विचारणा करण्यात आली. अचानक प्रश्न समोर आल्यानंतर डावीकडे बाजूलाच बसलेल्या उदयनराजे यांच्याकडून पाहून त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी वैयक्तिक आयुष्य असल्याचे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अजय मिश्रा म्हणाले की, इथ बसलेल्यांमध्ये शिस्त आहे, वैयक्तिकरित्या कोण काय करतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मात्र, उदयनराजे भोसले भाजपचा चेहरा आहेत, असे विचारण्यात आले असता त्यांनी हा व्यक्तीगत आरोप असल्याचे म्हणाले. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी डान्स केलेला नाही. व्हिडिओ आपल्याला दाखवू का? अशी विचारणा संबंधित पत्रकारकडून करण्यात आल्यानंतर घरी कोण काय करतं हा आपला विषय असल्याचे नमूद केले. आमच्या पक्षातील सर्व शिस्तप्रिय आहेत. त्यांनी डान्स केलेला कार्यक्रम हा व्यक्तीगत कार्यक्रम होता, पक्षाचा नव्हता.
सातारमधील दंगलीवर काय म्हणाले?
सातारमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओमुळे धार्मिक तणाव निर्माण होऊन एकाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले असता ती घटना दुर्दैवी असल्याचे मिश्रा म्हणाले. त्या घटनांचे आम्ही समर्थन करत नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. त्या प्रकरणात एफआयआर दाखल झाला असून अटकही करण्यात आली आहे. आमचे सरकार कारवाई करेल.
इतर महत्वाच्या बातम्या