Satara Accident : कराडमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा भीषण अपघात, गाडी 20 फूट खाली कोसळली, 20 जखमी, पाच जणांची प्रकृती गंभीर
Karad Satara Accident News : पुणे–बेंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ वाठार गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली.

Karad Satara Accident News : पुणे–बेंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ वाठार गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहलीची बस तब्बल 20 फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक होते.
पाच विद्यार्थी गंभीर जखमी....
अपघाताचा आवाज होताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी थरारक प्रयत्न करण्यात आले. दुर्घटनेत पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून पंधरापेक्षा अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना तत्काळ कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट...
घटनास्थळी कराड पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून अपघाताचे कारण नेमके काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सहलीचा आनंद घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर क्षणात संकट कोसळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा -























