Rajya Sabha : राष्ट्रवादीकडून साताऱ्यात राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार; छगन भुजबळांच्या नावाची चर्चा
Rajya Sabha Satara News : महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त होत आहेत. दोनपैकी एक जागा महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाला देण्यात आली आहे. आता या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू आहेत.
Satara News : महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त होत आहेत. दोनपैकी एक जागा महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाला देण्यात आली आहे. आता या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal), बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे (Anand Paranjape), नितीन पाटील या नावांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील वरिष्ठ तीन नेत्यांची राज्यसभेच्या उमेदवारीचा अनुषंगाने काल (मंगळवारी) बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये विविध नावांच्या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीत वाई येथे जाहीर सभेत नितीन पाटील यांना सातारच्या खासदारकीच्या बदल्यात सातारला आगामी काळात खासदारकी देऊ असा शब्द दिला होता. भाजपने (BJP) राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभेची (Satara Lok Sabha) जागा घेताना आगामी काळात पियूष गोयल यांची राज्यसभेची जागा देऊ असा शब्द दिला होता. आता अजित पवार (Ajit Pawar) नितीन पाटलांना दिलेला शब्द पाळतील का असा प्रश्न विचारला जात आहे.यासंदर्भात देखील काल (मंगळवारी) झालेल्या बैठकीत याबाबत देखील चर्चा झाली आहे.
यासोबतच आगामी काळात विधानसभा निवडणुकीत जातीय गणितं लक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या समीर भुजबळ किंवा छगन भुजबळ यांना राज्यसभा मिळावी अशी भुजबळ कुटुंबाची मागणी आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जातीय गणितं देखील लक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
पियूष गोयल, उदयनराजे भोसले यांची जागा रिक्त
मुंबईतून पियूष गोयल आणि साताऱ्यातून उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर (Lok Sabha) निवडून गेले आहेत. त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. विधानसभा सदस्यांमधून ते राज्यसभेवर निवडून गेले होते. आता या 2 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यातील एक जागा भाजपकडे आहे. तर दुसरी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देण्यात आली आहे.
2019 मध्ये सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीनिवास पाटील यांनी जिंकली होती. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह अजित पवार गटाने महायुतीत धरला होता. मात्र, भाजपने उदयनराजे भोसले यांच्यासाठी ही जागा आपल्याकडे घेतली. ‘आम्ही लोकसभेची सातारची जागा भाजपला सोडली आहे. त्या बदल्यात राज्यसभेची उदयनराजेंची जागा भविष्यात रिक्त झाल्यास ती आम्हाला देण्याचा शब्द भाजपने दिला आहे' असे लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी स्पष्ट केले होते.