एक्स्प्लोर

Madan Bhosale: साताऱ्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी बंद दाराआड तासभर चर्चा, जयंत पाटील घरातून हसतहसत बाहेर पडले, राजकीय चर्चांना उधाण

Madan Bhosale meets Jayant Patil: मदन भोसले हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव आहेत. वाई मतदारसंघात त्यांचा मोठा प्रभाव आहे. ते विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश करु शकतात, अशी चर्चा आहे.

सातारा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटावर आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. यामध्ये आज भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांचाही समावेश झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी मदन पाटील यांची भेट घेतली.

जयंत पाटील हे मदन भोसले यांच्या घरी गेले होते. याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. या भेटीत जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्यासमोर शरद पवार गटात येण्याचा प्रस्ताव मांडला असावा, अशी शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मदन भोसले हे शरद पवार गटात गेल्यास वाई मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जयंत पाटील हे मदन पाटील यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले. मात्र, त्यांनी भेटीबाबत काही बोलण्यास नकार दिला. भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत, अशी मोघम प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र, आता मदन भोसले भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गोटात दाखल होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना शरद पवार गटाने गळाला लावल्याची चर्चा सुरु आहे. यापैकी कोल्हापूरमध्ये समरजीत घाटगे यांनी आपण शरद पवार गटात जाणार, हे जवळपास स्पष्टच केले आहे. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील, मदन भोसले हे हातात तुतारी धरतील, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. याशिवाय, अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे तेदेखील लवकर शरद पवार गटात जातील, अशी चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलावर शरद पवारांनी टाकलेले हे डाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला जेरीस आणतील, अशी चिन्हे आता दिसत आहेत. 

आणखी वाचा

हर्षवर्धन पाटील लवकरच मोठा निर्णय घेणार? भाजपाला जबर धक्का बसण्याची शक्यता, सुप्रिया सुळेंच्या विधानाने चर्चेला उधाण!

पुण्याच्या राजकारणातील मोठी बातमी, अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget