Udayanraje Bhosale : आरोप करणारे विद्वान असावेत, एक बोट दुसऱ्याकडं दाखवलं तर तीन बोटं आपल्याकडे; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंना अप्रत्यक्ष टोला
एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात, असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली.
Udayanraje Bhosale : जे आरोप करतात ते विद्वान असावेत. एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात, असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली. माझ्यावर अवास्तव आरोप केले जात असल्याचे उदयनराजे म्हणाले. घरपट्टी वाढीबाबत सगळे सोंग करु शकतात, पण पैशाचे सोंग करु शकत नाही. नगरपालिकेचा विस्तार वाढला आहे. खर्च वाढला असल्याचे उदयनराजे भोसले म्हणाले.
नेमकं काय म्हणाले उदयनराजे भोसले
महानगरपालिका करायची असेल तर लोकसंख्या वाढली पाहिजेत. लोकसंख्या वाढायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील असे उदयनराजे भोसले म्हणाले. सातारा नगरपालिकेची ईडीची चौकशी करा. कोणीही मागणी करो वा नको. मीच मागणी करत आहे. आत्ताची आणि आगोदरचीही असे उदयनराजे भोसले म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्यात उदनराजे तुम्ही का नव्हता असाही प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी प्रश्न चांगला आहे. सगळीकडे स्वागताचे बँनर लावले होते, एवढचे उत्तर उदयनराजेंनी दिलं. वाघनख्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, वाघनखे त्यावेळी चोरी झाली की नाही हे माहिती नाही .मी लहान होतो. शिवाजीराजेंच्या बाबतीतच तारीख आणि इतर वाद निर्माण केले जातात असे उदयनराजे म्हणाले.
मी जात-पात मानत नाही
जालन्यात होणारा उद्याचा कार्यक्रम काय ते माहिती नाही. मी जात-पात मानत नसल्याचे उदयनराजे म्हणाले. भविष्यकाळात मेरीटच बघितले जाणार. कायद्याप्रमाणे दहा वर्षानंतर लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्या. ठराव नाही नोटीफिकेशन नाही. बाकिच्या समाजाला तुम्ही आरक्षण देताय. देवाने सर्वांना बुध्दी सेम दिली नाही. खरी चुकी त्यावेळच्या राज्यकर्त्यांची आहे. कोणत्याही जातीचा असूदेत त्यांना तुम्ही आर्थिकदृष्या दुर्भलांना सहकार्य करा. आजची मुलं जी आहेत ती शिकली नाहीत तर भवितव्य राज्यकर्त्यांच्या हातात असल्याचे उदयनराजे म्हणाले.
जालन्याला मी जाणार नाही. जरांगे पाटील यांची सभा होऊन जाऊदेत. जातीची लोकसंख्या निश्चित होत नाही. दहा दहा वर्षाला जातीची लोकसंख्या निश्चित करावी लागेल. जर प्रश्न सोडवायचाच नसेल भिजत घोंगडे ठेवायचे असेल तर तस करा असेही उदयनराजे म्हणाले. मला जात ही मान्य नाही. एखाद्या एक्स वाय झेडला मागासवर्गिय म्हणायचा अधिकार दिला कोणी. मी मोठा तू हालका. एवढ जर करायचे असेल तर रक्त लावताना कोणाचे रक्त का पाहत नाही असे उदयनराजे म्हणाले. पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत तुम्हाला काय वाटते हे मला तुमच्याकडूनच जाणून घ्यायचे आहे.. माजी निवडणुकीची खाज भागली आहे. बघता बघता मी 50 कधी झालो माहिती नाही असे उदयनराजे म्हणाले. रिटायरमेंटचे जे वय शासनात असते तसे वय राजकारणात पाहिजेत. राजकरण्यांना ही लागू झाले पाहिजेत. प्रत्येकजण म्हणणार लोकांचा आग्रह होता म्हणू मी असे उदयनराजे म्हणाले. शरद पवारांनी आता मार्गदर्शक म्हणून असावे असे मला वाटत असल्याचे उदयनराजे म्हणाले.