एक्स्प्लोर

Jaykumar Gore : सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, तो आम्हीच लढवणार, आमदार जयकुमार गोरेंचा दावा, अजित पवारांच्या निर्णयाला आव्हान? 

Jaykumar Gore : महायुती सरकरामध्ये लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. कारण आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा मतदारसंघातून निवडणूक भाजपच लढवणार असल्याचा दावा केला आहे. 

सातारा : सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी (Ajit Pawar) दावा केल्या नंतर आता साता-यातील मतदासंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन चांगलच रणकंदन सुरु झाल्याचं चित्र आहे. त्यातच आता भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असून आम्हीच याठिकाणी निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झालीये. त्यातच महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा जागावाटपावरुन नाराजीनाट्य होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले हे खासदार आहेत. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून श्रीनिवास पाटील नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी देखील या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जागावाटपाच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. 

जयकुमार गोरेंनी काय म्हटलं?

सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केल्या नंतर आता साता-यातील मतदासंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन चांगलच रणकंदन सुरु झालंय.भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी म्हटलं की, सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असून आम्हीच याठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. मागील चार वर्षांत साताऱ्यात भाजपने मोठ्या ताकदीने काम केलं आहे. त्याचप्रमाणे भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोणी काहीही भूमिका मांडली तरीही कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपकडेचं राहिलं पाहिजं असं मत पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं. 

अजित पवारांनी काय म्हटलं होतं?

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष बारामती , शिरूर , सातारा आणि रायगड मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल असं म्हटलं.  पक्षाच्या कर्जतमध्ये सुरु असलेल्या दोन दिवसीय शिबिरात बोलताना अजित पवारांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर  या  चारपैकी तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाची लढत शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध होण्याची शक्यता आहे.  राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार जिथून निवडणून आलेत त्या बारामती , सातारा , शिरूर आणि रायगड या लोकसभेच्या चार जागा आपला पक्ष लढवेल असं अजित पवारांनी जाहीर केलं. 

हेही वाचा :

अजित पवारांनी जाहीर केलेल्या 4 जागांवर 2014 आणि 2019 मध्ये काय झालं होतं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget