एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Murder Case Sudarshan Ghule: सुदर्शन घुलेचा मोबाईल डाटा 'फॉरेन्सिक'कडून रिकव्हर, वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार?

Santosh Deshmukh Murder Case Sudarshan Ghule: सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

Santosh Deshmukh Murder Case Sudarshan Ghule: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी पोलीस सुनावण्यात आली आहे. सुदर्शन घुले याची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी एसआयटीकडून बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली. सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सीक विभागकडून रिकव्हर करण्यात आला आहे. त्यानूसार पुढे तपास करायचा आहे, असा मुद्दा मांडण्यात आला. यानंतर न्यायालयाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

सुदर्शन घुलेला खालील मुद्द्यांवर 4 दिवसांची मिळाली पोलीस कोठडी-

- सदर आरोपीचा मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सीक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथून रिकव्हर करण्यात आलेला असून त्या अनुषंगाने आरोपीकडे तपास करणे अत्यंत गरजेचे आहे.

- सदर आरोपीचे जप्त केलेल्या 02 मोबाईल पैकी एक मोबाईलचे लॉक ओपन झालेले नसून आरोपीकडुन मोबाईल लॉक ओपन करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे.

- सदर आरोपी हा पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असतांना तपासामध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही. त्यामुळे सदर आरोपीस अधिक विश्वासात घेऊन तपास करणे बाकी आहे.

- सदर आरोपीवर एकुण 09 गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपींनी एकत्रितरित्या बरेच गुन्हे केलेले असल्याने दाखल गुन्हा व संबंधीत गुन्हे याबाबत तपास करणे आहे.

- सदर गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम- 1999 चे  कलम 3(1)(i), 3(1)(ii),3(2),3(4) अन्वये कलमवाढ करण्यात आलेली असुन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सुदर्शन घुले हा टोळीप्रमुख म्हणून काम करत असल्याने त्याचेकडे विचारपूस करणे आहे.

- सदर आरोपी हा टोळीप्रमुख असल्याने त्याचे सांगणेप्रमाणे इतर आरोपींनी गुन्हेगारी कट रचुन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने सखोल तपास करणे बाकी आहे.

कोण आहे सुदर्शन घुले?

सुदर्शन घुले बीडमधील केजचा टाकळी गावचा रहिवाशी आहे. सुदर्शन घुले 27 वर्षांचा आहे. सुदर्शन घुलेचं इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा. सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे. सुदर्शनवर 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर  आली आहे. याचदरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यातून त्याला काही कामं मिळाली. राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे गावकरी सांगतात.

संबंधित बातमी:

Sudharshan Ghule: वाल्मिक कराड सरेंडर, पण सुदर्शन घुले त्यापेक्षा डेंजर; सरपंच हत्येतील मुख्य आरोपी घुले कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Actress Hayden Panettiere Passes Away: वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
August 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget