तेजस्वी सातपुतेंची बदली भोंदू खरातच्या माध्यमातून झाली, चाकणकरांच्या सांगण्यावरून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
Rupali Thombare On IPS Tejaswi Satpute : रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर होत्या, त्यांच्या बहिणीच्या नावे अनेक आर्थिक व्यवहार झालेत. तरीही त्यांच्यावर गुन्हा नोंद नाही, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

पुणे : नाशिकचा भोंदू खरातच्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी आता त्यांच्यासह या प्रकरणातील एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्यावरही आरोप केले आहेत. तेजस्वी सातपुतेंच्या आतापर्यंतच्या बदल्या या खरातच्या माध्यमातून होत असायच्या असा दावा रुपाली चाकणकर करायच्या. त्यामुळेच चाकणकरांच्या सांगण्यावरून तेजस्वी सातपुतेंनी पुण्यात असताना खोटे गु्हे दाखल केले होते, असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.
खरात प्रकरणात रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांना आणि तेजस्वी सातपुतेंना लक्ष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, "खरात प्रकरणातील एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांची आम्ही भेट घेतली होती आणि त्यांना रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. मात्र सातपुतेंनी शेवटपर्यंत चाकणकरांवर तक्रार दाखल केली नाही. मात्र रुपाली चाकणकरांवर टीका केलेल्यांवर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले."
'तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यतमातून'
तेजस्वी सातपुतेंची पुण्याला बदली झाल्यानंतर त्यांनी सात महिन्यांनी एक खोटी तक्रार दाखल केली होती. रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून ही तक्रार दाखल केली होती, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला. तेजस्वी सातपुतेंच्या आजपर्यंतच्या बदल्या या अशोक खरातच्या माध्यमातून म्हणजे स्वतःच्या माध्यमातून केल्याचं रुपाली चाकणकर सांगायच्या, असा दावा रुपाली ठोंबरे यांनी केला.
खरातसोबत फोटो आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप करत नाही, तर चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर होत्या म्हणून त्यांच्यावर आम्ही आरोप करत आहोत, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, "रुपाली चाकणकरांच्या नावे, त्यांच्या बहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या नावे पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. असं असलं तरी त्यांना आरोपी करण्यात आलं नाही. खरातच्या अनेक आर्थिक प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकरांची बहीण ही नॉमिनी आहे. असं असलं तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही."ट
चाकणकरांनी पदाचा गैरवापर केला
चाकणकरांनी अनेक महिलांना, नेत्यांना अशोक खरातकडे नेलं. त्यांनी ज्या ज्या राजकारणी लोकांना खरातकडे नेलं आहे, त्यांना आता धमक्या देत आहेत. मला वाचवा नाहीतर तुमचे फोटो व्हायरल करेन अशा धमक्या चाकणकर देत आहेत. त्यातून पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जात आहे, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला.
रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या ट्रस्टवर होत्या. त्यांनी खेमनार नावाच्या पत्रकाराला माफी मागायला लावली. रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी अनेक खोटे गुन्हे दाखल केले. हे सगळं रुपाली चाकणकरांनी पदाचा गैरवापर करून केला, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला.
ही बातमी वाचा:
Before You Go
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..





















