एक्स्प्लोर

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्येची चौकशी CID पोलिस महासंचालक करणार, तपासाची कार्यकक्षा गृहविभाग ठरवणार

Santosh Deshmukh Murder Case : बीड हत्याकांडावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला. या प्रकरणाची संपूर्ण कहाणी सांगत त्यांनी यामध्ये कुणाकुणाचा हात आहे त्यांची नावंही घेतली आहेत.

बीड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ पातळीवर होणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीआयडीचे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी 11 वाजता विधानसभेत सविस्तर निवेदन सादर करणार असल्याची माहिती आहे. 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी कोणते अधिकारी तपास करतील यावर गृहविभागाकडून निर्णय होणार आहे. तसेच या तपासाची कार्यकक्षा काय असणार हेदेखील गृह विभाग ठरवणार आहे.

मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव 

बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन आरोपी फरार आहेत. पवनचक्की खंडणी वादाप्रकरणी ही हत्या झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले हे अजितदादांच्या राष्ट्रवादीशी संबंधित होते. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर या खंडणीप्रकरणी ज्या वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत.

बीडमधील या हत्याकांडावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला. या प्रकरणाची संपूर्ण कहाणी सांगत त्यांनी यामध्ये कुणाकुणाचा हात आहे त्यांची नावंही घेतली. तसेच जोपर्यंत या प्रकरणी आरोपींचे कॉल रेकॉर्ड काढले जात नाहीत तोपर्यंत त्यांना आदेश देणारा मास्टरमाईंड समोर येणार नाही असं ते म्हणाले होते. 

या प्रकरणी वाल्मिक कराड या व्यक्तीचा संबंध असून त्याला अटक करा अशी मागणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. तर केजच्या आमदार नमिता मुंडदा यांनीदेखील या प्रकरणी आरोपींना अटक करावी अशी मागणी केली. रोहित पवार यांनीदेखील वाल्मिक कराड यांचे नाव घेऊन त्यांना अटक करा अशी मागणी केली. दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी या प्रकरणी संसदेत आवाज उठवला. 

वसुलीबाजांना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा

बीड प्रकरणी शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. राज्यातील एकाही वसुलीबाजाला सोडणार नाही असा इशारा त्यांनी गुरुवारी दिला. आता बीडच्या प्रकरणावर ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Shubh Yog: आज श्रावण गुरूवारी नीचभंग राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, लक्ष्मीनारायण पाठीशी..
आज श्रावण गुरूवारी नीचभंग राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, लक्ष्मीनारायण पाठीशी..

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Embed widget