वर्षाला डाळिंबातून एक कोटींचं उत्पन्न, दहावीत मिळवले 48 टक्के, गावाने फ्लेक्स लावून केले अभिनंदन!
sangli ssc result : आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडीती या गावातील प्रणव सूर्यवंशी या मुलाला दहावी मध्ये 48.20% इतके मार्क मिळाले.
sangli ssc result : आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडीती या गावातील प्रणव सूर्यवंशी या मुलाला दहावी मध्ये 48.20% इतके मार्क मिळाले. त्याला इतके कमी मार्क मिळवून देखील गाव त्याचं फ्लेक्स लावून हार्दिक अभिनंदन करतेय. कारण प्रणवला पहिल्यापासून अभ्यासाचा कमी आणि डाळिंब शेतीचा जास्त नाद लागला होता. 10 एकरावरील डाळिंब शेती प्रणव एकटा सांभाळतो आणि मागील वर्षी या शेतातून 1 कोटी 20 लाखाचे उत्पन्न त्याने काढलंय.. त्यामुळे अभ्यासात जेमतेम असलेला प्रणव दहावीत 48.20 टक्क्यावर का होईना पास झाला पण दहावीत असून देखील तो प्रगतशील बागायतदार आहे. याचा आनंद गावकऱ्यांना आहे. त्यामुळे गावात प्रणवचे काठावर का पास होईना त्याचे अभिनंदनचे भरे मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहे.
सोमवारी महाराष्ट्रामध्ये दहावीचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. पण आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडीतील गावात केवळ 48.20% मार्क मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्याचे गावाने फ्लेक्स लावून त्याचं अभिनंदन केलंय. शाळेत एक दिवसही न जाता शेतीकडे पूर्ण लक्ष देऊन 48.20% मार्क घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रणव सूर्यवंशी यांचे अभिनंदन. तर हा आहे प्रणव शंकर सूर्यवंशी (वय 16 वर्ष) प्रणव हा इयत्ता दहावी मध्ये शिकत होता. त्याला अभ्यासापेक्षा शेतीची प्रचंड आवड होती आणि या वयात देखील तो त्याच्या डाळिंब शेतीत सगळी कामे करत होता. अपार कष्ट करण्याची आहे. तसे खानजोडवाडी गाव हे डाळिंबाचे कॅलिफोरनिया म्हणून ओळखले जाते...इथे घरटी डाळिंब शेती आहे. त्यामुळे प्रणवला डाळिंब शेतीचे प्रचंड वेड आहे. तो स्वतः 10 एकरावरची डाळिंब बाग सांभाळतो आहे.. डाळिंब शेतीत औषध मारण्यापासून ते सर्व कामे प्रणव या वयातच शिकला. दहावी मध्ये शाळेला असून त्याने शाळेकडे एवढे लक्ष दिले नाही पण डाळिंब शेतीत लक्ष दिले.
शिक्षणाला आपल्या समजमध्ये अनन्य साधारण महत्व आहे पण आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीची आवड जोपासलीच पण जेमतेम अभ्यास देखील केला पाहिजे. हेच प्रणवने केले आणि शेतीची कामे आणि अभ्यास या दोन्ही गोष्टीमध्ये समनव्य साधून प्रणव ने शेती मध्ये कष्ट करत करत दहावी ची परीक्षा दिली. तो 48.20% मार्क मिळून तो पास झाला. त्याच्या ह्या गोष्टीचा सर्व गावाला आनंद झाला. त्यामुळे सर्व गावांनी मिळून त्याचे पोस्टर लावले त्याचा आदर सत्कार केला. शिक्षण सोबत शेती ला ही महत्व देण ही काळाची गरज आहे हे प्रणव ने दाखवून दिल. त्यामुळे एकीकडे कमी वयात असताना देखील 48.20% मिळालेल्या प्रणवचा गावाला सार्थ आभिमान वाटतो.
तसं तर एकदाही शाळेत न जाणारा विद्यार्थी हा नापासच होतो . गावकऱ्याना देखील प्रणव नापासच होणार असं वाटत होते. मात्र प्रणवने शेती करत असताना स्वतःच्या हिमतीवर थोडाफार का होईना पण अभ्यास केला .आणि तोच अभ्यास प्रणवला पास करून गेला.. तुम्ही म्हणाल आता शाळेत एक दिवसही न जाता काठावर पास होणाऱ्या प्रणवचे कौतुक कशासाठी? प्रणव जरी अभ्यासात टॉपर नसला तरी त्याला 16 व्या वर्षी आलेले व्यवहारज्ञान आणि शेतीमधली आलेली समज ही महत्वाची आहे.त्यामुळे भले तो अभ्यासात कच्चा आहे पण शेती करण्यात तो आताच पक्का झालाय. त्यामुळे गाव 48 टक्के मिळवणाऱ्याचं कौतुक करेतेय.