सांगली : सांगलीमधील (Sangli News) तासगावमध्ये भाजप खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka patil) आणि आमदार सुमनताई पाटील (Sumantai patil) यांच्यात पुन्हा जुंपली आहे. टेंभू योजनेत गावे समाविष्ठ करण्याच्या मागणीवरुन गांधी जयंतीपासून आमदार सुमनताई पाटील यांनी आमरण उपोषण (Hunger Strike) करण्याचा इशारा दिला आहे. यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी हल्लाबोल करताना पुत्रप्रेमापोटी आमदार सुमन वहिनी आंधळ्या झाल्याचे म्हटले आहे. 


सुमनताई पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्यनंतर सांगलीत वातावरण चांगलंच तापलं आहे. संजयकाका पाटील यांनी हे उपोषण म्हणजे तुमच्या 45 वर्ष च्या राजकीय अपयशाची कबुली आहे असे म्हणत पुत्रप्रेमापोटी आमदार सुमन वहिनी आंधळ्या झाल्या आहेत, उपोषण करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका केली. पाटील यांनी उपोषण आंदोलन सुरु होण्यापूर्वीच सुमनताई पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 


सावळजसह परिसरातील आठ गावे गेल्या अनेक वर्षापासून टेंभूच्या पाणी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. टेंभू योजनेच्या अहवालास तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन या आठ गावांचा योजनेमध्ये समावेश व्हावा, यासाठी गांधी जयंतीपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमन पाटील यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदनही सुमनताई पाटील यांनी दिलं आहे. यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. 


आत्तापर्यंतचा सगळा इतिहास पुराव्यानिशी जनतेसमोर आणू 


विस्तारित सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेल्या 2350 कोटींमध्ये त्या 8 गावांचा समावेश आहे. आता पाणी येत आहे आणि आपल्या मुलाचे राजकीय भवितव्य अंधारात जाईल. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी गांधी जयंती पासून उपोषण करण्याचा केविलवाणी प्रयत्न चालवला आहे. त्यांनी असे प्रकार थांबवावेत अन्यथा स्वर्गीय आर आर आबांच्या हयातीपासून आत्तापर्यंतचा सगळा इतिहास पुराव्यानिशी जनतेसमोर आणू , असा गर्भित इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी दिला.


जि.प. सदस्य ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंत ज्या सावळज परीसराच्या जीवावर मजल मारली त्या गावांना तुमच्या 45 वर्षे कारकिर्दीत हक्काचे पाणी देता आलं नाही, अशी टीकाही सुमनताई पाटील यांच्यावर केली. गावच्या शेतकऱ्यांसह बैठक घेवून सदर वंचित गावाचा टेंभू विस्तारित योजनेमध्ये समावेश होवून सुधारित प्रशासकीय मान्यता अंतिम टप्पात आली आहे.  हे सांगितल्यानंतर उपोषणाची नौटंकी व राजकीय स्टंटबाजी सुरु आहे, असे खासदार संजयकाका पाटील यांनी म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या