पुणे : विसर्जन मिरवणुकीनंतर पुण्यात हत्येचा (Pune Murder) थरार घडला. सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा आणि अनेक नेत्यांच्या ओळखीचा असलेल्या विजय ढुमे यांची बांधकामाच्या लोखंडी सळई आणि भरीव लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून हत्या करण्यात आली. सिंहगड रोडवर हा हत्येचा थरार घडला. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्यानंतर सायंकाळी सिंहगड रस्त्यावर ही खळबळजनक घटना घडली. विजय ढुमे हे सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असून त्याचे अनेक बड्या पोलिस अधिकार्‍यांशी मैत्रीचे संबंध होते आणि अनेक राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते. 


क्वॉलिटी लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे सध्या पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 


पुण्यात भररस्त्यातील थरार संपेना...


काहीच दिवसांपूर्वी  पुण्यात चाकूने वार करत तरुणाची (Pune Crime News) दहा ते बारा जणांनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना होती. ही घटना पुण्यातील मंगला टॉकीज (Mangla Talkies Pune) परिसरात रात्री एक वाजताच्या सुमारास घडली होती. चित्रपट पाहून बाहेर (Murder Case) पडताना या तरुणावर वार करण्यात आले होते. नितीन मस्के (Nitin Maske) असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव होतं.नितीन चित्रपट गृहातून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्यावर चाकुने वार करण्यात आले होते. यामध्ये नितीन मस्के याचा जागीच मृत्यू झाला. तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड अशी हत्यारे घेऊन दहा ते बारा जणांनी घेरून मस्के यांची हत्या केली होती.


भररस्त्यात होणाऱ्या या प्रकारामुळे अनेकांच्या मनात धडकी...


पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं दिसत आहे. कोयता गॅंग आणि क्षृल्लक वादातून या घटना पुढे येतात. मात्र या घटनेमुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण होतं. कोयता गॅंगचे हल्ले संपायचं नाव घेत नाही आहे. त्यात अशा घटना पुढे आल्याने पोलिसांवरचादेकील ताण वाढतो. पुणे पोलिसांनी पुण्यात गुन्हेगारी थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. मात्र तरीही या गुन्हेगारीला आळा बसत नसल्याचं चित्र आहे. भररस्त्यात होणाऱ्या या प्रकारामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime : पुरंदरमधील रावडेवाडीत दोन गटात तुफान राडा, एकाचा खून तर तीन जण जखमी