Horoscope Today 4 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 7 जुलै 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरीमध्ये कामाचा फडशा पाडाल, त्याचा परिणाम आर्थिक सामाजिक सर्व स्तरावर होणार आहे
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कर्तृत्वाची वेगळी क्षेत्रे तुमच्यासाठी खुली होतील या संधीचा फायदा अवश्य घ्यावा
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज मानसिकदृष्ट्या अतिशय नाजूक वळण आल्यामुळे अति भावनाप्रधानता तुमच्या स्वभावात दिसेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कोणत्याही गोष्टीचा चटकन मनावर पगडा बसल्यामुळे काही कामे अविचाराने होण्याची शक्यता आहे
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्या मुली स्वभावाचे दर्शन होईल मुळातच उदार असल्यामुळे परोपकार करण्याचे अनेक प्रसंग शोधून काढाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात तडजोडीचे वातावरण ठेवावे लागेल गायन वादन कला अवगत असणाऱ्यांना संधी निर्माण होतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांना कुटुंबात लोक मान देतील, कर्तृत्व दाखवण्याची कोणती संधी तुम्ही आज सोडणार नाही
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात कात टाकल्याप्रमाणे पुन्हा एक ओजस्वी व्यक्तिमत्व इतरांना तुमच्यात पाहायला मिळेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज तुमच्या पुढे मागे तुमचे चाहते घरट्या घालतील. अशावेळी त्यांना बसायला पाट्या पण जेवणाचे ताट देऊ नका
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज घरामध्ये तुमच्या मतांना किंमत दिली जाईल, पूर्वी जे पेरले असेल ते उगवायला सुरुवात होईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रत्येक गोष्टीचा विचार आर्थिक बाजून कराल. त्यामुळे आज मिळणारे लाभ सुद्धा तुम्हाला मोलाचे वाटतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावे लागतील, त्यातून लाभ होतील.
हेही वाचा :
Navpancham Yog 2025: 7 जुलै लक्षात ठेवा! 3 राशींच्या हातात मावणार नाही इतका पैसा येणार, नवपंचम योगामुळे कुबेराची मोठी कृपा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
