सांगली : पंधरा दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील (Sangli News) अंकली फाट्यावर नाकाबंदी करत असताना कारने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) रामराव गोविंदराव पाटील (वय 55, रा. डोंगरसोनी, ता. तासगाव, जि. सांगली) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. शुक्रवारी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. श्रेणी उपनिरीक्षकाचा अपघाती करुण अंत झाल्याने सांगली पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा पोलिस दलातील (Sangli Police) सर्व अधिकारी उपस्थित होते.
नाकाबंदी करताना अंकली फाट्यावर कारची धडक
सांगलीमधील अंकली (ता. मिरज) येथे पंधरा दिवसांपूर्वी नाकाबंदी करताना पीएसआय रामराव पाटील यांना कारने जोराची धडक दिली होती. या धडकेत पाटील गंभीर जखमी झाले होते. पाटील यांच्यासह त्यांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजेकडून आलेली कार मोटार (एमएच-42-बीजे- 4693) भरधाव वेगाने आल्यानंतर पोलिस पथकाने थांबवण्याचा इशारा केला. यावेळी या चौकातील वळण लक्षात न आल्याने कारने रस्त्यावर थांबलेल्या पाटील यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झाल्यानंतर पाटील यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाटील यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या