एक्स्प्लोर

Sangli Crime : सांगली पोलिसांकडून तब्बल 18 कोटींची व्हेल माश्याची उलटी पुन्हा जप्त; मालवणमधून मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या

Sangli Crime : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार्‍या मुख्य सूत्रधाराला सांगली पोलिसांनी (Sangli Police) अटक करून 18 कोटी 60 हजार मूल्याची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे.

Sangli Crime : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार्‍या मुख्य सूत्रधाराला सांगली पोलिसांनी (Sangli Police) अटक करून 18 कोटी 60 हजार मूल्याची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. मुख्य सूत्रधार निलेश रेवंडकर याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सांगलीत कारवाई झाल्याचे समजताच रेवंडकरने मालवण पोलिसांना व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ समुद्रकिनारी पडला असल्याची बतावणी केली होती. सांगलीचे पथक त्याच्या मूळगावी गेल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्याचा बनाव उघड झाला. पोलिसांनी आतापर्यंत 24 कोटी 39 लाख 25 हजार रूपयांची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. मुख्य सूत्रधाराचे नाव समजताच पथकाने मालवणला जाऊन मुख्य सूत्रधार रेवंडकरला ताब्यात घेतले. अटकेची कारवाई करण्यासाठी पोलीस पर्यटक बनून गेले होते.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी सांगलीतील शामरावनगरमध्ये छापा टाकून अंबरग्रीस तस्करी प्रकरणी सलीम गुलाब पटेल आणि अकबर याकूब शेख यांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडून तस्करीसाठी आणलेली 5 किलो 710 ग्रॅम वजनाची अंबरग्रिस जप्त करण्यात आली होती. याचे मूल्य पाच कोटी 75 लाख 50 हजार रूपये आहे.

सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून काही दिवसांपूर्वी सांगली शहरामध्ये व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली होती. सापळा रचून त्यांच्याकडून 5 किलो 700 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली होती. त्याची किंमत बाजारामध्ये पावणे सहा कोटी रुपये असल्याचे समोर आलं होतं. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून तपासामध्ये या तस्करी प्रकरणी मुख्य सूत्रधाराचं नाव समोर आल्यानंतर गली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधून निलेश रेवंडकर यास अटक करत त्याच्याकडून 18 किलो वजनाची व्हेलची उलटी हस्तगत केली. 

सांगलीमध्ये आपल्या साथीदारांना अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर निलेशने मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर व्हेलची उलटी सापडल्याचा बनाव करत मालवण पोलिसांकडे जमा केले होते. सदर माहिती मिळाल्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गतीने तपास करत नीलेशला अटक केली आहे. त्याच्याकडून 18 किलो सहाशे ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी हस्तगत करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात याचे मूल्य 18 कोटी 60 लाख रूपये आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Sangli ST Bus Accident : सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, प्राथमिक माहिती 
सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, 15 ते 16 जण जखमी

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget