Sangli News : भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल
विजय ताड यांची शुक्रवारी गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी जत पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत नगरसेवकाचे भाऊ विक्रम ताड यांनी संशयित म्हणून संदीप उर्फ बबलू चव्हाण नामक व्यक्तीसह त्याच्या साथीदारांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तसेच या फिर्यादीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.
फिर्यादीमध्ये माजी नगरसेवक उमेश सावंत यांचाही उल्लेख
विजय ताड यांची शुक्रवारी गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे. दरम्यान मृत माजी नगरसेवक विजय ताड यांचे बंधू विक्रम ताड यांनी जत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीमध्ये संदीप उर्फ बबलू चव्हाणने त्याच्या साथीदारासोबत आपल्या भावावर गोळ्या झाडून आणि दगड घालून खून केल्याची तक्रार दिली आहे. त्याचबरोबर फिर्यादीमध्ये जत भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
विजय ताड नगरसेवक असताना उमेश सावंत यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केला होता, असे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे विजय ताड आणि उमेश सावंत यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता हे समोर आले आहे. मात्र, ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जत पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या अटकेनंतरच या हत्येच्या उलगडा होणार आहे.
मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले पण...
दरम्यान, नगरसेवक विजय ताड आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी शुक्रवारी (17 मार्च) निघाले होते. अल्फान्सो स्कूलजवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला हे मात्र समजू शकलेलं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या