Sadabhau Khot : देवाभाऊचे आडनाव जर देशमुख किंवा पाटील असते तर मी कधीच आमदार झालो नसतो : सदाभाऊ खोत
Sadabhau Khot On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी सावलीसारखे आहेत, आज मी आमदार असल्यानेच माझ्यामागे लोक आहेत असं सदाभाऊ खोत म्हणाले.

सांगली : आपण अपघाताने आणि अपवादाने राजकारणात आलो आहोत, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच आमदार आणि मंत्री झालो, राजकारणात फडणवीसांचा आधार मिळाला असं आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले. देवेंद्र फडणवीसांचा आडनाव जर देशमुख किंवा पाटील असते तर हा सदाभाऊ कधीच आमदार झाला नसता असंही ते म्हणाले. सदाभाऊ खोत सांगलीतील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.
वाळवा तालुक्यातील कामेरी गावातील भाजपाचे युवा नेते जयराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार सदाभाऊ खोत बोलत होते. आता आमच्याकडे पद आहे म्हणून आमच्यामागे गडी आहेत, नाहीतरी कुणीही विचारत नाही असं सदाभाऊ खोत म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली.
देवेंद्र फडणवीस सगळ्यांना सोबत नेणारे
देवाभाऊ माझ्यासाठी सावलीसारखे आहेत. त्यांचे आडनाव देशमुख किंवा पाटील असते तर हा सदाभाऊ कधीच आमदार होऊ शकला नसता. देवाभाऊंचे आडनाव फडणवीस आहे म्हणूनच आमच्याकडे पदे आहेत. देवेंद्र फडणवीस हे 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारे नेते आहेत असं सदाभाऊ खोत म्हणाले.
राजकारणामध्ये देवाभाऊ आधार
राजकारण करताना कुणाचा तरी आधार लागतो, तो आधार मला देवाभाऊचा मिळाला. देवाभाऊमुळे हा सदाभाऊ आमदार आणि मंत्री झाला असं सदाभाऊ खोत म्हणाले. ते म्हणाले की, आम्ही खूप हाल खाल्लं आहे. मुळात आम्हाला या डब्यातच येऊ देत नाहीत. आमची परिस्थिती अशी आहे म्हणून इथे जागा मिळाली. आम्हाला जर कुणी नमस्कार केला नाही तर आम्हीच त्याला नमस्कार करतो. आमच्याकडे त्याने पाहिलं नाही तरीही आम्ही त्याच्याकडे पाहत बसतो.
राजकारण लई बेक्कार
सदाभाऊ खोत म्हणाले की, "मंत्रिपदाचा मला आशीर्वाद दिला म्हणतात. पण मला ते मिळणारच नाही त्याचा आशीर्वाद देतात. मला मंत्रिपद मिळालं तर मी घेतोच, पण तुम्ही शिफारस केली पाहिजे. गडी आत गेल्यावर सांगतात की, सदाभाऊला मंत्रिपद देऊ नका. माझं तिकीट फायनल झालं होतं. पण आमच्या जिल्ह्यातले काही गडी गेले आणि सदाभाऊला सोडून कुणालाही तिकीट द्या असं म्हणाले. बाहेर आल्यानंतर मला म्हणाले की तुमच्याच नावाची शिफारस केलीय. राजकारण वाईट आहे."
ही बातमी वाचा:
























