Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Sadabhau Khot on Sharad Pawar : काही दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना मुस्लिमांचे सासरे असे संबोधले होते. आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती (mahayuti) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. आता आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर तोफ डागली आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा उल्लेख अलिबाबा म्हणून केला आहे.
'शरद पवार हे अलिबाबा आणि पवारांच्या भोवती जमलेले गडी हे चाळीस चोर आहेत', अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. जतमध्ये पोलीस पाटील यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन व शासन आभार मेळाव्यात सदाभाऊ खोत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस हे जालीम औषध
शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मात्र, मराठा आरक्षण (Maratha Reservation) आमचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. त्यामुळे हे पवार साहेबांच्या लक्षात आले की देवेंद्र फडणवीस हे जालीम औषध आहे. फडणवीस एकच गोळी देताय आणि सगळा रोग बरा करताय हे पवारांच्या लक्षात आले आहे. म्हणून सकाळ-संध्याकाळ उठले की सगळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते बोलतात.
सगळ्यांना देवेंद्र फडणवीस नावाचा भस्म्या रोग
एकप्रकारे पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळ्यांना देवेंद्र फडणवीस नावाचा भस्म्या रोगच झाला आहे. या लोकांना देवेंद्र फडणवीस शिवाय दुसरं काही दिसत नाही, अशा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तर आता सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर शरद पवार गट काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव हे अहमदनगरच ठेवावं, यासाठी मुस्लीम बांधवानी शरद पवारांसमोर आंदोलन केले होते. यावेळी शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली होती. सदाभाऊ भाऊ खोत यांनी मुस्लीमांना शरद पवारांचे जावई असे संबोधले होते. त्यांनी म्हटलं होतं की, हा आंदोलनाचा प्रकार शरद पवारांच्या ताफ्यासमोरच का व्हावा, कारण त्यांना माहिती आहे की, आपला सासरा आता आलेला आहे. त्यामुळे जावयांनी तिथे आरोळी दिली की, अहमदनगरचे नाव अहमदनगरच ठेवा, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले होते.
आणखी वाचा