एक्स्प्लोर

मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत

आमदार सुधीर  गाडगीळ हे आपले स्वीय सहाय्यक (PA), अंगरक्षक, फोटोग्राफर आणि वाहनचालक यांच्यासह चारचाकी वाहनातून उगार येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते.

सांगली : राज्यातील रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून वाहन सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आणि चिंताजनक बनला आहे. सांगली (Sangli) विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ (MLA) यांच्या चारचाकी वाहनाला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात (Accident) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात आमदार सुधीर  गाडगीळ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहनातील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे सुदैवाने आमदार गाडगीळ व त्यांचे सहकारी मोठ्या अनर्थातून बचावले आहेत. अपघातात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून येतं आहे, त्यावरुन अपघाताची तीव्रता लक्षात येईल.

आमदार सुधीर  गाडगीळ हे आपले स्वीय सहाय्यक (PA), अंगरक्षक, फोटोग्राफर आणि वाहनचालक यांच्यासह चारचाकी वाहनातून उगार येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परतत असताना, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अंकलीच्या दिशेने जात असताना 'वडडी आणि कृष्णा घाट' रस्त्यादरम्यान हा अपघात झाला. कृष्णा घाट सर्व्हिस रोडजवळ अचानक एक दुचाकी वाहन आमदार गाडगीळ यांच्या कारसमोर आडवे आले. या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारमधील सुरक्षेसाठी असलेल्या एअरबॅग्ज तात्काळ उघडल्या. त्यामुळे आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला लागलेली किरकोळ दुखापत वगळता मोठा अनर्थ टळला. ​

कारमधील अंगरक्षक नागेश भोकरे, फोटोग्राफर विकास गुंडप आणि चालक गणपती दरेकर हे सर्वजण सुदैवाने सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातात दुचाकी चालकही जखमी झाला असून, त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेतून 'मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ​अपघातानंतर आमदार सुधीर  गाडगीळ यांना तातडीने दुसऱ्या वाहनातून खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

हेही वाचा

टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक, या प्रकरणातील सूत्रधारांवर मकोका लावावा, एकनाथ शिंदेंची मागणी, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget