एक्स्प्लोर

सदाभाऊंचा पॉवर प्ले, शेतमाल विक्रीसाठी पहाटेच मंडईत !

मुंबई :  व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद ठेवल्याने आता शेतमाल विकण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरलं आहे. मुंबईतल्या दादर मार्केटमध्ये कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विक्रीला उतरवला. दादरच्या मार्केटमध्ये ३०० गाड्यांची आवक झाली.   यावेळी स्वत: सदाभाऊ खोत हे रस्त्यावर उतरुन मार्केटची पाहणी करत होते. नुकतंच सदाभाऊ खोत यांनी कृषी आणि पणन राज्यमंत्रीपदाचा भार स्वीकारला आहे. त्यानंतर लगेचच सदाभाऊ कामाला लागले आहेत.  सदाभाऊ खोत यांनी आज पहाटेच दादर मार्केटमध्ये हजेरी लावली.   शेतकऱ्याला पुन्हा अडचणीत आणू नका "व्यापाऱ्यांनी संप मागे घ्यावा. त्यांच्यासाठी सरकारकडून चर्चेची दारं खुली आहेत. तीन-चार वर्षांपासून शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पुन्हा एकदा शेतकऱ्याला अडचणीत आणू नका. शेतकऱ्याची सद्यस्थिती पाहून, पणन विभागाने शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकांना विकता यावा अशी यंत्रणा उभी केली. महापालिकेच्या भाजी मंडईत आज भाजीपाला पोहोचला. उद्यापासून पुन्हा गाड्या वाढवू", असं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.   शेतकरी पिकवायला आणि विकायलाही शिकतोय पूर्वी माझा शेतकरी पिकवायला शिकला होता, मात्र विकायला शिकला नव्हता. आता स्थिती बदलत आहे, शेतकरी पिकवायला आणि विकायलाही शिकतोय याचा आनंद आहे. सरकार तुमच्या बाजूचं आहे, तुम्ही चिंता करु नका. हा दिलासा मी शेतकऱ्याला देतो, असं आश्वासन सदाभाऊंनी दिलं.   तोडगा न निघाल्यास कडक पावलं उचलू बाजार समित्यांबाबत उद्या बैठक बोलावण्यात आली आहे. उद्या तोडगा निघेल अशी आशा आहे. चर्चेने प्रश्न सोडवू, पण तोडगा निघालाच नाही, तर सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही, कडक पावलं उचलू. व्यापाऱ्यांना शेतकरी आणि ग्राहकांना कोंडीत पकडून देणार नाही, असं सदाभाऊंनी ठणकावलं.

महत्त्वाच्या बातम्या

WTC Points Table : WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने भारताची कोंडी; न्यूझीलंडची भरारी, टीम इंडिया कुठे अडकली?
WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने भारताची कोंडी; न्यूझीलंडची भरारी, टीम इंडिया कुठे अडकली?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Embed widget