एक्स्प्लोर

Jailer 2 OTT: रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?

Rajinikanths Jailer 2: रजनीकांत यांचा 'जेलर 2' हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफर्मवर रिलीज होणार?

Rajinikanths Jailer 2 OTT: सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता रजनीकांत यांचा 'जेलर 2' (Jailer 2) हा    सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. सिनेमाची डिजिटल रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ज्या प्रेक्षकांना    हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहता आला नाही, त्यांना हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पाहता येईल. हा सिनेमा प्रेक्षक ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते.  आपण आता हा सिनेमा घरबसल्या पाहू शकता. 

रजनीकांत यांचा 'जेलर 2' प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार (Rajinikanths Jailer 2 OTT Release Date Confirmed)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत यांचा 'जेलर 2'  हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'जेलर 2' हा सिनेमा स्ट्रीम होणार आहे.  प्राइम व्हिडीओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती  शेअर केली आहे.  5 नोव्हेंबर रोजी या ओटीटी प्लॅटफॉर्मने या सिनेमाची वर्ल्डवाइड स्ट्रीमिंग प्रीमिअरची घोषणा केली. प्राइम व्हिडीओने सोशल मीडियावर ही माहिती शेअर करताना लिहिले की,  'टायगर मुथुवेल पांडियन परत आले आहेत. जेलर 2 हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर 12 नोव्हेंबर रोजी स्ट्रीम होणार आहे'.

प्राइम व्हिडीओने सिनेमाबद्दल केलेल्या घोषणेमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे, रजनीकांत यांची पुन्हा एकदा दमदार आणि अॅक्शन शैली पाहायला मिळणार आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार,  'जेलर 2' या सिनेमाने चित्रपटगृहांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.  या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 21 व्या दिवशीही आपली दमदार कामगिरी कायम ठेवली होती. दरम्यान, 'जेलर 2'ने  बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. 

'जेलर 2' या सिनेमाची एकूण नेट कमाई 466.05 कोटी रुपये इतकी आहे. तर, ग्रॉस कलेक्शन 545.10 कोटी रुपये इतके आहे.  तर,  परदेशात या सिनेमाने 276 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. यामुळे जगभरातील या सिनेमाची एकूण कमाई 821.10 कोटी इतकी झाली आहे.  नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर 2' या सिनेमाची निर्मीती सन पिक्चर्स बॅनरखाली कलानिधी मारन यांनी केली आहे.  रजनीकांत पुन्हा एकदा निवृत्त जेलर टायगर मुथुवेल पांडियन यांची भूमिका साकारत आहे.  या सिनेमात अभिनेता मोहनलाल आणि विजय सेतुपती यांसारखे दिग्गज कलाकारही पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Kareena Kapoor khan on Saif ali khan Attack: 'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor khan on Saif ali khan Attack: 'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
Amruta Khanvilkar: 'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
Dhanush Spotted With Mystery Woman: धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
Shraddha Kapoor First Reaction On Etha Movie: 'स्त्री 2 नंतर बऱ्याच ऑफर्स आल्या, भरमसाठ पैसेही दिले, पण...'; श्रद्धा कपूरनं बड्या ऑफर्स नाकारून 'ईठा'ला होकार का दिला?
'स्त्री 2 नंतर बऱ्याच ऑफर्स आल्या, भरमसाठ पैसेही दिले, पण...'; श्रद्धा कपूरनं बड्या ऑफर्स नाकारून 'ईठा'ला होकार का दिला?
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Embed widget