Rohini Khadse : रुपाली चाकणकरांच्या कार्यकाळात महिलांवर अनेक अन्यायाच्या घटना, त्या केवळ पार्ट टाईम अध्यक्षा; रोहिणी खडसेंचा हल्लाबोल, म्हणाल्या....
Rohini Khadse on Rupali Chakankar: रुपाली चाकणकर या पार्ट टाईम अध्यक्ष म्हणून काम पाहत असल्याने त्यांच्या जागी कार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा नेमण्यात याव्या, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.

Rohini Khadse : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या काळात महिलांना अपेक्षित असलेला न्याय मिळत नसल्याने अनेक महिलांवर अन्यायाच्या घटना घडल्या आहेत. किंबहुना रुपाली चाकणकर या पार्ट टाईम अध्यक्ष म्हणून काम पाहत असल्याने त्यांच्या जागी कार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा नेमण्यात याव्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी लेखी पत्राच्या द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.
राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर आरोप करीत आपल्या स्वीयसहायकाच्या पत्नीला धमकी दिल्याचा आरोप केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी भाष्य करत म्हटले आहे कि, आपल्या स्वीयसहायकाच्या पत्नीला धमकी दिल्याचा आरोप रुपाली चाकनकर यांनी केला असला तरी, याबाबत आपल्याला माहीत नाही. जर आपल्याबाबत त्यांच्याकडे तक्रार असेल तर त्यांनी माझ्याबाबत नोटीस काढायला हवी होती. स्वीय सहायक नाफडे यांच्या पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद आहेत. त्याला मी कशी जबाबदार असू शकते? असा प्रतिसवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
....तर आज वैष्णवी जिवंत राहिली असती
याउलट वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Death)प्रकरणात तिच्या जेठानीने आपल्या सासऱ्याच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर जर महिला आयोगाने त्याच वेळी दखल घेतली असती तर आज वैष्णवी जिवंत राहिली असती. रुपाली चाकणकर या आपल्या पदाच्या बाबत कार्यक्षम पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांच्या एवजी कार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा नेमण्यात याव्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केली आहे. आपल्या अजित दादा गटाच्या प्रवेशाबाबत मिडियामध्ये चर्चा आहेत. मात्र या केवळ चर्चा आहेत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा होत असल्यातरी त्या बाहेर चर्चा आहेत, असेही त्या म्हणाल्या. आपण शरद पवार यांच्या सोबत आहोत. ते जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण असणार असल्याचंही रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या नव्हे हत्या
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकारात ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचा आरोप करताना रोहिणी खडसे यांनी पोलिसांनी लावण्यात आलेली कलमे ही किरकोळ स्वरूपाची असल्याने पुढील काळात आरोपी सुटू शकतात, असेही म्हटले आहे. या आरोपी विरोधात गंभीर कलमे लावण्यात यायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्याच बरोबर या घटनेत बार कौन्सिलने आरोपीचं वकील पत्र घेऊ नये, अशी आमची मागणी आहे. राज्यातील हुंडाबळी होऊन नये यासाठी आम्ही राज्यभर महिलांच्या पाठीशी उभ राहणार असल्याचं ही रोहिणी खडसे यांनी यावेळी म्हटले आहे.
हे ही वाचा























