एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे यांचा आज बारसू दौरा; रिफायनरी विरोधकांची भेट घेणार तर राजापुरात समर्थकांचा मोर्चा

Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे आज (6 मे) रत्नागिरीतील बारसू गावाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे इथे रिफायनरी विरोधक तसंच समर्थकांची भेट घेणार आहेत.

Uddhav Thackeray Barsu Visit : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (6 मे) रत्नागिरीतील (Ratnagiri) बारसू (Barsu) गावाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे इथे रिफायनरी विरोधकांची भेट घेणार आहेत.

सकाळी नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे मुंबईतील मातोश्री निवासस्थानाहून बारसूसाठी रवाना होतील. जुहू इथून हेलिकॉप्टरने ठाकरे बारसू इथे जातील. दरम्यान उद्धव ठाकरे हे रिफायनरी विरोधकांना भेटणार आहेतच मात्र समर्थक देखील त्यांची भेट घेणार आहेत.  

दोन ठिकाणी विरोधकांची भेट होणार

उद्धव ठाकरे दोन ठिकाणी विरोधकांना भेटणार आहेत. सोलगाव फाट्यावर देवाचे गोठणे, गोवीळ आणि गिरमादेवी कोंड या ठिकाणी बारसू आणि परिसरातील विरोधकांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास गिरमादेवी कोंड इथे उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बारसूमध्ये

बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीचं माती परीक्षण सुरु आहे. परंतु रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेही बारसूमध्ये जात आहेत. रिफायनरीच्या मुद्द्यावर आजवर जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्या आरोपांना उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यात उत्तर देणार का, हा प्रश्न आहे.

उद्धव ठाकरे समर्थक आणि विरोधकांना भेटणार : सचिन अहिर

"आजचा दिवस महत्त्वाचा आहे. रोजगार जरी असला तरी ती जागा कोणाची आहे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. पक्षप्रमुख बारसूला जात आहेत आणि लोकांना समजून घेणार आहेत. उद्धव ठाकरे समर्थक आणि विरोधक या दोघांनाही भेटणार आहे. तसंच आदित्य ठाकरे देखील पुण्यात वेताळ टेकडी आणि चिपको आंदोलकांच्या  भेटीसाठी जात आहेत. दोन्ही विषय पर्यावरणाविषयी आहेत, त्यामुळे महत्त्वाचे आहेत," असं ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

हजारो रिफायनरी समर्थक उद्धव ठाकरेंची भेट घेणार

यावेळी रिफायनरी समर्थकही ठाकरेंची भेट घेऊन, संमतीपत्रं सादर करणार आहेत. रिफायनरी प्रकल्पाला राजापूर तालुक्यात असलेले समर्थन ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी राजापुरातील विविध 51 संघटना, ग्रामपंचायतींचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो समर्थक त्यांची भेट घेणार आहेत. 

राजापूरमध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा

राजापूरमध्ये आज रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा निघणार आहे. सकाळी 10 वाजता राजापूर शहरातील जवाहर चौक येथे हजारोंच्या संख्येने समर्थक एकत्र येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जठार हजर असणार आहेत. यावेळी रिफायनरीसाठी असलेले समर्थन दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget