एक्स्प्लोर

उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे सहा खासदार फोडून बहुचर्चित ऑपरेशन टायगर (Operation Tiger) अखेर यशस्वी केल्याची चर्चा सुरु आहे. यावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली.

Ramdas Kadam :  एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे सहा खासदार फोडून बहुचर्चित ऑपरेशन टायगर (Operation Tiger) अखेर यशस्वी केल्याची चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाच्या सहा बंडखोर खासदारांनी बुधवारी नवी दिल्लीतील लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र गटाची नोंदणी केल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा अध्यक्षांनी या सहा बंडखोरांच्या गटाला मंजुरी दिल्याचेही समजते. अशातच यावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत आणि भासक्र जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ही वेळ का आली, याबाबत उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं. आता उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार, असा टोलाही रामदास कदमांनी लगावला. तसेच भास्कर जाधव तरी पक्षात राहतील का? त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान रामदास कदमांनी दिले. 

ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य निर्णयावर तांत्रिक अडचण येणार नाही 

आमदार, मंत्री आणि आता खासदारही पक्ष सोडत असल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. सर्वांना चालते व्हा म्हणण्याने मराठी माणसाचे नुकसान होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. लहान तोंडी मोठा घास घेतोय, म्हणत उद्धव ठाकरेंवर बोचरी टिप्पणी रामदास कदमांनी केली. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य निर्णयावर तांत्रिक अडचण येणार नाही असा दावा कदमांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांना कायदेशीर आणि प्रशासकीय कामाचा अनुभव नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

नैतिकता असेल तर संजय राऊतांनी राजीनामा का दिला नाही?

संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलताना रामदास कदम म्हणाले की, चाळीस आमदारांच्या जीवावर संजय राऊत खासदार झाले. नैतिकता असेल तर राजीनामा का दिला नाही? असा सवाल राऊतांनी केला. जगा सांगे ब्रह्मज्ञान...म्हणत संजय राऊत यांच्यावर टीका केली. भास्कर जाधव तरी पक्षात राहतील का? त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान रामदास कदमांनी दिले. ये दिन कट जायेंगे... देखो आगे क्या होता है...म्हणत भास्कर जाधवांना इशारा दिला आहे. ठाकरे गटात आणखी राजकीय घडामोडी होण्याचे संकेत मिळत आहेत. 

कुठलंही ऑपरेशन सक्सेस झालं नाही, अरविंद सावंतांचा दावा

ऑपरेशन टायगर पूर्ण झालं की नाही याबाबत अद्यापही दोन्ही पक्षाकडून भूमिका स्पष्ट नाही. याशिवाय, ठाकरेंचे खासदारही माध्यमांपुढे येऊ आपली भूमिका मांडताना दिसत नाही. त्यातच, खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप बजावला असून उद्या खासदारांची बैठक असल्याची माहिती दिली होती. तसेच, आता राडा होईल म्हणत फुटणाऱ्या खासदारांना संजय राऊत यांनी थेट इशारा देखील दिला होता. आता, खासदार अरविंद सावंत यांनी कुठलंही ऑपरेशन सक्सेस झालं नाही, सर्वच खासदार आमच्यासोबत असल्याचं म्हटलं. तर, दुसरीकडे आज झालेले ऑपरेशन टाइगर फुल प्रूफ झालं असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता, तब्बल 20 वर्षानंतर मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता, तब्बल 20 वर्षानंतर मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget