एक्स्प्लोर

Raj Thackeray Uddhav Thackeray : वरळीत ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, तब्बल 19 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर; शिंदेंच्या 'जय गुजरात'ला उत्तर मिळणार?

Raj Thackeray Uddhav Thackeray Rally: ठाकरे बंधू आज विजयी मेळावा घेत आहेत. या विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधू सरकारवर कोणता निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे ठाकरे बंधू तब्बल एकोणीस वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. वराई डोममध्ये आज होणाऱ्या या मेळाव्याच्या निमित्ताने ते एकत्र तोफ डागणार आहेत. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून सरकारने काढलेला जीआर मागे घेण्यास भाग पाडल्यानंतर हा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून ठाकरे बंधू सरकारवर जोरदार टीका करणार हे निश्चित आहे. एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' घोषणेने आणि सुशील केडे यांच्या वक्तव्याने या टीकेला आणखी धार येणार आहे. ठाकरे बंधूंनी हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आंदोलनाची हाक दिली होती आणि अखेर सरकारला तो जीआर मागे घ्यावा लागला होता. आता या विजयी मेळाव्यातून ते आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील आणि सरकारला आव्हान देतील, सोबतच नव्या राजकीय समिकरणाची नांदी आज बघायला मिळणार का? ही उत्सुकता राजकीय वर्तुळासह तमाम महाराष्ट्रवासीयांना लागली आहे. 

विजयी मेळावा नेमका कसा असेल?

विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. आज सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोम ला पोहोचतील. दरम्यान, या विजयी रॅलीत कोणकोणते नेते भाषण करणार आहेत, याबाबतची माहिती मिळाली आहे. आजच्या विजयी मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होणार आहेत. जर काँग्रेसचे नेते आले तर त्यांना देखील भाषण करण्याची संधी दिली जाणार आहे. शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असणार आहे. डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावली जाणार आहे. बहुदा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाण्याची शक्यता आहे. 

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या 'जय गुजरात'ला उत्तर मिळणार?

दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना जय गुजरातवरून लक्ष केल्यानंतर शिंदेंच्या सेनेकडूनही आता ठाकरे पिता-पुत्र आणि शरद पवार यांचा जुना व्हिडिओ समोर आणत टिका करणार्‍यांना आरसा दाखवला आहे. शिंदेच्या सेनेकडून व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओत शरद पवार हे जय हिंद जय कर्नाटक जय महाराष्ट्र म्हणत आहेत. तर उद्धव ठाकरेंकडूनही जय गुजरातची 2019च्या लोकसभा निवडणूकीतला व्हिडिओ समोर आणला आहे. तर आदित्य ठाकरेंचा जय उत्तरप्रदेश म्हणाल्याचा व्हिडिओ समोर आणला आहे. त्यामुळे आज ठाकरे बंधुकडून शिंदेच्या वक्तव्याचा समाचार घेण्याची शक्यता असतानाच शिंदेंनीही ठाकरेसह पवारांना आरसा दाखवला आहे. त्यामुळे या टीकेला आता या विजयी मेळाव्यातून नेमकं काय उत्तर दिलं जातं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget