एक्स्प्लोर

पाली खोपोली मार्गावर एसटी आणि सेलेरो कारचा भीषण अपघात, काच फोडून बाहेर आले विद्यार्थी

Accident : बसची मागील काच फोडून 48 एनसीसी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात सेलेरो कारमधील डॉ. आयुष गायकवाड आणि विशाल पाटील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

रायगड :  पाली खोपोली (Pali- Khopoli) राज्य महामार्गावर दापोडे हद्दीत एसटी बस व सेलेरो कारचा भीषण अपघात झाला आहे.एस टी बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  या अपघातात  सुदैवाने कोणतीही जीवीतहनी झाली नाही. मात्र काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (मंगळवारी)  हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार,  एसटी बस कर्जत खोपोलीमार्गे माणगावकडे जात होती. तर सेलेरो कार पाली बाजूकडून खोपोलीकडे जात होती. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस विद्यार्थ्यांसहीत पलटी झाली. मागील काच फोडून 48 एनसीसी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात सेलेरो कारमधील डॉ. आयुष गायकवाड आणि विशाल पाटील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तात्काळ पाली पोलीस व स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य सुरू आहे या आपघातात कारचं आणि बसचं मोठं नुकसान झालं आहे.

रायगडमध्ये बस दरीत कोसळली

रायगडमधील कोंझर घाटात एका बसाला अपघात झाला आहे. ही बस कोंझरवरून मुंबईच्या दिशेला जात असताना रस्त्याच्या बाजूला चिखलात घसरल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच  कोंझर गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गाडीमधून अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बसमध्ये दहा महिला व 10 लहान मुले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रस्त्यालगत गेलेल्या या जागेवर चिखल असल्याने गाडी फार दूर गेली नसल्याची माहिती आहे. झाडाचा आधार घेत बस चालकाने बस सुरक्षितपणे थांबवण्याचा प्रयत्न केला. बसमधील सर्वच प्रवाशांना  सुखरूप गाडीतून बाहेर काढून रस्त्यावर आणण्यात आले आहे. स्थानिकांनी घाबरेल्या प्रवाशांना धीर दिला. 

धुळे जिल्ह्यातील अपघातात 4 जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली. येथील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नरडाणा येथे भागवत कथेचा कार्यक्रम आटपून परतताना इको व्हॅनला दसवेल फाट्याजवळ भरधाव पिकपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anandache Paan : लेखक Sudhir Rasal यांच्याशी 'Vindanche Gadyaroop' पुस्तकानिमित्त खास गप्पा 29 DecChenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special ReportABP Majha Headlines : 02 PM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPrajakta Mali on Suresh Dhas : सुरेश धस प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Mumbai : मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला
हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला
Arvind Kejriwal : या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवालांचे सनसनाटी आरोप
या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवालांचे सनसनाटी आरोप
Gunaratna Sadavarte : प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले
प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले
Embed widget