एक्स्प्लोर

Raigad Crime : देशातील सर्वात मोठ्या 'डिजिटल अरेस्ट' फसवणुकीची भांडाफोड, विविध राज्यातून 11 जणांना अटक

Raigad crime news:विविध राज्यांतून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात 66 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Cyber crime Raigad: “तुमच्यावर गुन्हा दाखल आहे”, “सुप्रीम कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे” अशा भीतीदायक वक्यांमधून सामान्य नागरिकांना गाफील ठेवत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सायबर टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली सुरू असलेल्या या फसवणुकीचा भंडाफोड करत पोलिसांनी देशातील विविध राज्यांतून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात 66 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

कसे करत होते फसवणूक?

आरोपी हे वेगवेगळ्या राज्यांतून नागरिकांना कॉल करत. “तुमच्यावर गुन्हा दाखल आहे, तुम्हाला अटक होऊ शकते. यासाठी तुमचा डिजिटल अरेस्ट करण्यात येणार आहे,” असं सांगत ते नागरिकांना गोंजारत. त्यानंतर “जर तुम्हाला या प्रकरणातून सुटायचं असेल तर अमुक इतकी रक्कम भरावी लागेल,” अशा फसव्या धमक्या आणि लालच दाखवत ऑनलाईन पैसे उकळायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्यावर गुन्हा दाखल आहे तुमच्यावर सुप्रीम कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे अस सांगून डिजिटल अरेस्ट माध्यमातून लाखोंचा गंडा घालणाऱ्या भुरट्या डिजिटल चालाखबाज चोरट्यांचा रायगड पोलिसांनी अखेर पर्दाफाश केलाय. वेगवेगळ्या कंपनीचे सीम कार्ड वापरून देशातील अनेक भागातील नागरिकांना डिजिटल माध्यमातून घाबरवण्याचा बनाव करत या नागरिकांकडून तब्बल 66 लाख रूपयांची डिजिटल फसवणूक केल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणातून उघडकीस आला आहे.

विविध टेलिकॉम कंपन्यांचे सिमकार्ड वापरत गंडा

तुम्हाला या प्रकरणातून सुटायचे असेल तर वेगळे पैसे भरावे लागतील अशी लालच दाखवून वेगवेगळ्या भागातील नागरिकांना या चोरट्यांनी गंडा घातला होता. देशातील सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट चा गुन्हा असल्याची माहिती रायगडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली आहे. त्यामुळे दलाल आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.आरोपी विविध टेलिकॉम कंपन्यांची सीमकार्ड वापरून नागरिकांना कॉल करत असत. हा डिजिटल फसवणुकीचा प्रकार देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा असल्याचे रायगडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्पष्ट केलं आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी 

1. अब्दुल सलाम बारभुयान, उत्तरप्रदेश

2. बिलाल फैजान अहमद, लखनौ

3. नदीम महंमद अस्लम अहमद, जैनपूर

4. लॉरेब मोहंमद रफिक खान, उत्तरप्रदेश

5. शदाब रियाज अहमद खान, उत्तरप्रदेश

6. मोहंमद फैसल खान, उत्तरप्रदेश

7. बालमोरी विनायककुमार राव, हैदराबाद

8. गंगाराम गंगाधर मुट्टन, हैदराबाद

9. अभय संतप्रकाश मिश्रा, उत्तरप्रदेश

10. मोहसीन मियां खान, उत्तरप्रदेश

11. शम्स ताहीर खान, राजस्थान

काय काय जप्त करण्यात आले ?

*6176 सीम कार्ड्स

* 66 लाखांचे डिजिटल व्यवहार

* 112 बँक खाती

* 35 मोबाईल फोन्स

* कॅनरा बँक एटीएम कार्ड्स

 

महत्त्वाच्या बातम्या

शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget