एक्स्प्लोर

10 वर्षात 6000 कोटी खर्च करुनही मुंबई-गोवा हायवेची दयनीय अवस्था, ऐन पावसाळयात वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा हायवेच्या कामासाठी गेल्या 10 वर्षात 6000 कोटी खर्च करण्यात आले आहेत, मात्र, इथली दयनीय अवस्था पाहता नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

रायगड : मुंबई-गोवा हायवेवर (Mumbai Goa Highway) चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ऐन पावसाळयात मुंबई-गोवा हायवेची दयनीय अवस्था झाली आहे. याला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित करत प्रवाशांनी रोष व्यक्त केला आहे. महत्त्वाचं म्हणजे याचं मुंबई-गोवा हायवेच्या कामासाठी गेल्या 10 वर्षात 6000 कोटी खर्च करण्यात आले आहेत, मात्र, तेथील दयनीय अवस्था पाहता नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

ऐन पावसाळयात मुंबई-गोवा हायवेची दयनीय अवस्था

गेली 17 वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्णच अवस्थेत आहे. रायगड जिल्ह्यातला बहुतांश भाग हा अर्धवट स्थितीतच असल्याचं पाहायला मिळत आहे. नागोठणे जवळील एका वळणावर या हायवेची सूरु असलेलं काम प्रवासी वर्गाला मात्र डोकं दुःखी ठरताना पाहायला मिळतायत. संपुर्ण रस्त्यावर चिखल झाल्याने येथील वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर टाकण्यात आलेले मातीचे ढिगारे या संपूर्ण प्रकाराला कारणीभूत ठरत असून जणू अपघाताला आमंत्रणच देत असल्याच हे चित्रं आहे.

वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

रायगडमध्ये रखडलेला मुंबई-गोवा हायवे पायाभूत मूलभूत नागरी समस्या जैसे थेच असून आजवरचे लोकप्रतिनिधी या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोकणात जोरदारा पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर टाकलेल्या मातीचं रुपांतर चिखलात झालं आहे. या चिखलातून वाहनचालकांना अत्यंत कसोशीने वाट काढावी लागत आहे. येथून प्रवास करताना अपघाताची भीतीही आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा हायवेचं काम रखडलेलंच पाहायला मिळत आहे.

10 वर्षात 6000 कोटी खर्च

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी गेल्या 10 वर्षात 6000 कोटी खर्च करण्यात आले असल्याची माहिती याआधी माहिती अधिकारातून समोर आली होती. मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) प्रकल्पावरील खर्चाची महत्त्वाची महिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे (Jitendra Ghadage) यांनी यासंबंधी मिळवलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) 10 वर्षात 6000 कोटी खर्च करण्यात आले आहेत.  

दुरुस्तीच्या कामासाठी 192 कोटी रुपये खर्च

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र पीडब्ल्यूडी या दोघांकडून आरटीआय कायद्यांतर्गत या वर्षाच्या सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, नवीन चौपदरी महामार्गासाठी एकूण 6000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 192 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा खर्च रस्त्याच्या सध्याच्या स्थितीच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची आणि देखरेखीची  तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget