एक्स्प्लोर

Uran Vidhan Sabha : उरण विधानसभेत होणार चुरशीची लढत, शेकापचे प्रीतम म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात, पुन्हा तिहेरी सामना?

Uran Vidhan Sabha Constituency : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघात विवेक पाटील, मनोहर भोईर आणि महेश बालदी यांच्यात तिहेरी सामना रंगला. यंदाच्या निवडणुकीतही तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

रायगड : विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election) जसं जशी जवळ येत आहे तसं तशी कार्यकर्त्यांची धावपळ उडालेली पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघात (Uran Vidhan Sabha Constituency) सध्या अपक्ष लढलेले आणि अपक्ष म्हणून विजयी झालेले महेश बालदी (mahesh baldi) यांची चांगली पकड आहे. त्यांनी राज्यातील सत्ता स्थापन करताना भाजपला (BJP) पाठींबा दिला. मात्र, यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघात कोण बाजी मारणार? असा प्रश्न सर्वांना पडून राहिलाय.

शिवसेनेच्या मनोहर भोईर (Manohar Bhoir) यांचा मागच्या निवडणूकीत 5 हजार 710 मतांनी पराभव झाला. त्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची देखील मोठी ताकद या मतदार संघात असल्याचे दिसून आले. मनोहर भोईर यांचा निसटता पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. यंदाच्या  निवडणूकीत पुन्हा ते उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर तिसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नावाची देखील शेकापमधून जोरदार चर्चा आहे.

प्रीतम म्हात्रे उरण मतदारसंघातून इच्छुक 

उरण मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात प्रितम म्हात्रे उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी नाव चर्चेत राहिलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या पराभवानंतर पक्षाची धुरा तरुण आणि तडफदार कार्यकर्ते प्रीतम म्हात्रे यांच्या हातात देण्यात आली आहे. त्यामुळे एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असणारा उरण मतदारसंघ विवेक पाटील यांच्या पराभवामुळे निसटला. आता मात्र पुन्हा हातातून गेलेला मतदार संघ मिळविण्यासाठी प्रीतम म्हात्रे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जोरदार या मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेताना दिसत आहेत. 

शेतकरी कामगार पक्षाने तरुण चेहऱ्याची निवड 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातून तिहेरी लढत झालेली सर्वांनी पाहिली. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर भोईर तर अपक्ष लढलेले महेश बालदी या तिहेरी लढतीत महेश बालदी विजयी झाले. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा एकेकाली बालेकिल्ला असणारा हा गड पुन्हा गमवावा लागला होता. मात्र तो पुन्हा मिळवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने तरुण चेहरा म्हणून प्रीतम म्हात्रे यांची निवड केली आहे. 

प्रीतम म्हात्रे विधानसभेत करिष्मा करणार?

प्रीतम म्हात्रे यांनी शेकापच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच उरणमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत एक सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मतदारसंघात आपली छाप उमटविण्यास सुरूवात केली आहे. शेकापला सध्या नव्या चेहऱ्याची प्रतीक्षा होती. प्रीतम म्हात्रे यांचा पनवेल महानगर पालिकेतील नगरसेवक, ते विरोधी पक्ष नेते असा राजकिय प्रवास आहे. शिवाय त्यांना राजकारणाची आवड असल्याने या विधानसभेत त्यांचा करिष्मा कामी येऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

उरण विधानसभेत होणार चुरशीची लढत 

सध्याचे आमदार आणि अपक्ष लढलेले महेश बालदी हे भाजपकडून उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जातंय. त्यामुळे त्यांना महायुतीकडून पुन्हा भक्कम पाठींबा मिळू शकतो. तर मनोहर भोईर यांना पक्षात पडलेली फूट पाहता मोठी ताकद स्वबळावर तयार करावी लागणार आहे. त्यामुळे होणाऱ्या निवडणूकीत कोण बाजी मारेल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

Raigad Politics : रायगडमध्ये महायुतीत सत्तासंघर्षाची लढाई? शिवसेना भाजप संघर्ष शिगेला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget