भुजबाळांकडून ही अपेक्षा नव्हती; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून त्यांच्या या वेगळ्या भूमिकेमुळे समाजात वादळ निर्माण होत आहे असा नाराजीचा सूर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी माध्यमांशी बोलताना लावला.
नागपूर : इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत सरकार गंभीर असून स्वतः मुख्यमंत्री या प्रकरणात लक्ष घालून आहेत. सरकारने वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली असताना कारण नसताना समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सध्या होत आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून त्यांच्या या वेगळ्या भूमिकेमुळे समाजात वादळ निर्माण होत आहे. शासनाच्या वतीने कुठलाही धोरणात्मक निर्णय होण्यापूर्वी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न बरोबर नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना समज दिली असेलच, मात्र त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असा नाराजीचा सूर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी माध्यमांशी बोलताना लावला आहे.
भुजबाळांकडून ही अपेक्षा नव्हती
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भूमिकेने समाजात वादळ निर्माण होत आहे. खरंतर त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची भूमिका जरी आक्रमक असली तरी शासनाने युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात केली आहे. रांगे पटलांकडून 2 जानेवारीपर्यंत या कामाची मुदत सरकारने मागितलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या प्रकरणी गंभीर आहेत. त्यावर सर्वेक्षण पूर्ण करून अधिवेशनात काही मार्ग काढता येईल का यावर देखील कार्यवाही सुरू आहे. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देण्यासाठी शासन काम करीत आहे. असे असताना सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून होत असल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छगन भुजबाळांवर केला आहे.
सत्ता गेल्याने काही जण वैफल्यग्रस्त
राज्यभर न्या.शिंदे समिती महाराष्ट्रभर दौरा करून मराठा-कुणबी, कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर करत आहे. त्यात अनेक ठिकाणी मोडी लिपीतून मराठा-कुणबी नोंदी देखील शोधण्यात येत आहे. ज्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असेल त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क करून अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.काही ठिकाणी अडचणी येत असल्या तरी त्यावर काम सुरू आहे.खरतर प्रत्येकाल स्व:तचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात चांगले काम करीत आहेत.त्यामुळे काहींच्या पोटात दुखत आहे. त्यात दुर्देवाने सत्ता गेल्याने काही जण वैफल्यग्रस्त झाले आहेत असा टोला देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छगन भुजबाळांना लगावला आहे.
इतर महत्वाची बातमी
Radhakrishna Vikhe Patil on Chhagan Bhujbal : 'म्हणून' ओबीसी आंदोलन उभं करायचं योग्य नाही; आता राधाकृष्ण विखे पाटलांनी छगन भुजबळांचे कान टोचले!