(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून मंत्री छगन भुजबळांवर कडक शब्दात ताशेरे
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 2016 साली तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध 850 कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व इतर गैरव्यवहार प्रकरणांत गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात (Maharashtra Sadan Scam Case) ईडीच्या (ED) रडारवर असलेल्या मंत्री छगन मुजबळांवर (Chhagan Bhujbal) मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Seccion Court) अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. यापुढे विनाकारण सुनावणी तहकूब करणार नाही, अशा स्पष्ट शब्दात मुंबई सत्र न्यायालयानं भुजबळांना सुनावलं. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 2016 साली तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध 850 कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व इतर गैरव्यवहार प्रकरणांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे.
न्यायालयाकडून करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण
भुजबळांना सत्र न्यायालयाने फटकारताना लोकप्रतिनिधींवरील खटले जलदगतीने मार्गी लावावीत, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असल्याचे विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितले. मात्र, अनेक खटल्यांमध्ये लोकप्रतिनिधींकडून वारंवार सुनावणी तहकुब करण्याची विनंती येते. परंतु, यापुढे असं घडणार नाही, अपरिहार्य कारणास्तव सुनावणी तहकूब केली जाणार नाही, अशी स्पष्ट तंबी मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळांना दिली.
यांनी मनी लाँड्रिंगचा खटला रद्द करण्याची विनंती
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात पंकज व समीर भुजबळ यांनी मनी लाँड्रिंगचा खटला रद्द करण्याची विनंती करीत विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांच्यापाठोपाठ संजय जोशी, तन्वीर शेख, सत्येन केसरकर व राजेश धारप या चार आरोपींनी सुद्धा अर्ज केले आहेत. मात्र, भुजबळ बंधूसह सर्व आरोपींचे अर्ज न्यायालयानं नाकारले आहेत.
भुजबळांनी फर्नांडिस यांचे घर लाटल्याचा अंजली दमानियांचा आरोप
दरम्यान, दुसरीकडे, छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सांताक्रूझमधील फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत. फर्नांडिस कुटुंबाचं मुंबईतलं घर भुजबळांनी लाटल्याचा गंभीर आरोप दमानियांनी केला आहे. शनिवारी दमानियांनी भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखलं. अखेर दमानियांनी स्वत:च्या घरी पत्रकार परिषद घेत भुजबळांवर गंभीर आरोप केले.
इतर महत्वाच्या बातम्या