एक्स्प्लोर
सोबत येत नसल्याने प्रेयसीवर गोळीबार
पुणे : प्रेयसी सोबत येत नसल्यानं प्रियकराने तिच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या शिरोली येथे घडली. चाकण पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. आज सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली.
वीटभट्टीवरील मोकळ्या खोल्यांमध्ये तरुणी कुटुंबीयांसोबत राहते. तिथूनच काही अंतरावर तिचा प्रियकर तग धरून बसला होता. तरुणी किराणा माल घेण्यास घराबाहेर येताच तरुणाने तिच्यावर गोळ्या झाडल्या.
या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून खेड-राजगुरूनगर येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. गोळीबार करून तरुण त्याच्या चाकण येथील घरी निघाला असता, पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र त्याने बंदूक कुठून आणली याचा तपास खेड पोलीस घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement