एक्स्प्लोर

Baramati Swine Flu : स्वाईन फ्लूमुळे बारामतीमधील महिलेचा पुण्यात मृत्यू

Baramati Swine Flu : बारामती शहरातील 52 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने पुण्यात मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील केईएम रुग्णालयात 4 ऑगस्ट रोजी या महिलेचा मृत्यू झाला होता. परंतु 15 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतर जाहीर करण्यात आली.

Baramati Swine Flu : बारामती (Baramati) शहरातील 52 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने (Swine Flu) (H1N1) पुण्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील केईएम रुग्णालयात 4 ऑगस्ट रोजी या महिलेचा मृत्यू झाला होता. परंतु तिच्या मृत्यूची माहिती 15 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतर जाहीर करण्यात आली. पंधरा दिवस उलटून देखील, प्रशासनाने ही माहिती अंधारात का ठेवली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

बारामती शहरातील अशोकनगर येथे राहणाऱ्या महिलेला 25 जुलैपासून सर्दी, पडसे, खोकला, अंगदुखी याचा त्रास सुरु होता. संबंधित महिलेला त्रास होण्याआधी ती महिला 23 जुलैला महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्या महिलेला संसर्ग झाला असावा अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली. त्यानंतर महिलेने बारामती शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी विविध तपासण्या देखील केल्या होत्या. खाजगी डॉक्टरांमार्फत या महिलेला औषधे देखील सुरु करण्यात आली होती. त्यानंतर या महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने, बारामती शहरात स्वाईन फ्लूची तपासणी नसल्याने, पुणे इथल्या केईम हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात आली. 3 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूची तपासणी पॉझिटिव्ह आली. या महिलेवर केईम हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. परंतु, याच दरम्यान 4 ऑगस्ट रोजी या महिलेचा मृत्यू झाला. सध्या बारामती शहरात एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली.

दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. स्वाईन फ्लू होऊ नये यासाठी घेतली जाणारी खबरदारी, लक्षणे आणि उपचारांबद्दल जाणून घेऊया.

स्वाईन फ्लू कशामुळे होतो?
स्वाईन फ्लू, ज्याला स्वाईन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात, त्याचा परिणाम डुकरांमध्ये तीव्र श्वसन रोग झाला, जो नंतर मानवांमध्ये फ्लूचा H1N1 प्रकार, ए इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये विकसित झाला. 2009 ते 2010 या काळात जागतिक उद्रेकासाठी स्वाईन फ्लू जबाबदार होता. 2010 मध्ये स्वाईन फ्लूचे भारतात अंदाजे 10193 रुग्ण आढळले होते त्यापैकी 1035 जणांचा मृत्यू झाला.

स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो. जेव्हा एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक, तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसात संसर्गजन्य असतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकते.

सामान्य लक्षणे आणि खबरदारी
सर्दी, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्या ही सामान्य लक्षणे दिसतात. यामुळे घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा यासारख्या इतर लक्षणांसह न्यूमोनिया देखील होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे जसे गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगणे, गेट-टुगेदर आणि कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होणे टाळणे आणि सण-उत्सवादरम्यान योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे योग्य आहे.

निदान आणि उपचार 

  • H1N1 विषाणूच्या उद्रेकादरम्यान, BMC आरोग्य तज्ञांनी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार, इत्यादी सह-विकृती असलेल्या रुग्णांना अधिक सावधगिरी बाळगण्याची विनंती केली आहे.
  • H1N1 लक्षणांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्वतःला वेगळे म्हणजेच आयसोलेट केले पाहिजे आणि ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, घरी स्वत:च औषधे घेणे टाळावे.
  • स्वाईन फ्लूसाठी  (H1N1)सर्वात सामान्य आणि प्रमाणित स्क्रीनिंग चाचणी म्हणजे नासो-ओरोफरिंजियल स्वॅब्सवर पॉलिमरेझ चेन रिएक्शन (PCR) चाचणी. तथापि, सावधगिरी बाळगणे आणि वेळेवर तपासणी केल्याने एखाद्याला लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते.
  • उपचार आणि औषधांपेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Rohit Pawar Pune: चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप
चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget