(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Western Maharashtra Loksabha Election : पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा डंका; पश्चिम महाराष्ट्रात कोण विजयी?
राज्यात पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या 10 जागा आहेत. या जागांवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
पुणे : राज्यात पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या 10 जागा (Western maharashtra Loksabha election Result 2024) आहेत. या जागांवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सकाळी 10 वाजेपर्यंतच्या मतमोजणीतील कलानुसार महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर होतं. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) विजयी झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती महाराज (Shahu Maharaj) विजयी झाले आहेत. शिरुरमध्ये अमोल कोल्हे (Amol Kolhe) विजयी आहेत तर पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी आहेत. 10 पैकी सहा जागांवर महाविकास आघाडीन विजय खेचून आणला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोण विजयी?
-हातकलंगणे - धैर्यशील माने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
-कोल्हापूर छत्रपती- शाहू महाराज (काँग्रेस)
-लातूर- शिवाजीराव काळगे (काँग्रेस)
-माढा -धर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
-मावळ -श्रीरंग बारणे (शिवसेना)
-पुणे -मुरलीधर मोहोळ (भाजप)
-रायगड -सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
-सांगली- विशाल पाटील (अपक्ष)
-सातारा -उदयनराजे भोसले (भाजप)
-सोलापूर -प्रणिती शिंदे (काँग्रेस)
पश्चिम महाराष्ट्रातील ह़ॉट मतदारसंघ
पश्चिम महाराष्ट्रातील दोन मतदारसंघ हॉट मतदारसंघ मानले गेले. पश्चिम महाराष्ट्रात बारामती आणि शिरुर या दोन मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. त्यात तगडी लढत बाारमती आणि शिरुरमध्ये पाहायला मिळाली. शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत होती. त्यात अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार, असा चंग बांधला होता. मात्र आज अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचा दारुण पराभव केला.
सोबतच बारामतीकडे सर्व राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं होतं. बारामतील थेट नणंद भावजय अशी लढत होती. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळाली होती. अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या प्रचारादरम्यान दोन्ही पवारांनी एकमेकांवर टीका केली होती. पवार विरुद्ध पवार अशी लढत असल्याने सगळ्या राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं होतं. त्यात सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी जंग जंग पछाडला होता. गावोगावी जाऊन सभा घेतल्या. जनतेला काम करणार असल्याचा विश्वास दिला. त्यानंतरही सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव केला आहे.
ही बातमी वाचा :