Weather Forecast Update : राज्यात पावसाचं 'कमबॅक'! पुढील चार दिवस पुण्यासाठी येलो अलर्ट; विदर्भ मराठवाड्यात पावसाची काय स्थिती? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...
पुणे मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्टदेखील जाही करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुणे : पुणे मुंबईसह राज्यात पुढील (maharashtra weather update) चार दिवस पावसाचा अंदाज (Weather forecast) हवामान खात्याने दर्शवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्टदेखील जाही करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यात पावसाने मोठ्या ब्रेकनंतर काल रात्रीपासून पावसाने कमबॅक केला होतं. मुंबईतील (Monsoon update)अनेक भागात पाऊस पडला तर पुणे आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. शिवाय लोणावळ्यातदेखील पावसाने जोर धरला आहे. मात्र आता पुढील चार दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने शेतकऱ्यांची काही प्रमाणात चिंता मिटण्याची शक्यता आहे.
कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून कर्नाटकपर्यंत जात आहे. त्याचप्रमाणे 3 सप्टेंबरला उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची चक्रिय स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्याच ठिकाणी येत्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात 4 सप्टेंबरनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि मध्यमहाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
राज्यातील मध्यमहाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस येलो अलर्ट
3 आणि 4 सप्टेंबरला मध्यमहाराष्ट्रात आणि 4, 5 सप्टेंबरला मराठवाड्यात तर 5, 6 सप्टेंबरला विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या विभागात येलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याचं हवामान खात्याने दिला आहे.
पुण्यात हवामान कसं असेल?
3 सप्टेंबर - आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी, संध्याकाळी पूर्णतः ढगाळ ग्रहण्याची शक्यता. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या तेमध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे (घाट विभागात तुरळक ठेकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता )
4 सप्टेंबर - आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी, संध्याकाळी पूर्णतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)
5 सप्टेंबर - आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम त्यस्पाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाट विभागात तुरळक ठिकाणी नुसळधार पाऊस पडण्याची शक्यता )
6 सप्टेंबर - आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी, संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.
7 सप्टेंबर - आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
8 सप्टेंबर - आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.
2 sept, पुढील 4, 5 दिवस राज्यात मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे मुख्यतः मेघगर्जना सरींशी संबंधित असेल.@ClimateImd @RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/3HLF9dn5LU
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 2, 2023
इतर महत्वाची बातमी-
IMD Weather Update : देशाच्या 'या' भागांत मान्सूनचे पुनरागमन; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
