एक्स्प्लोर

उदयनराजेंना तातडीचं काम आलं की आणलं गेलं.. बैठकीला गैरहजर राहिल्याने मेटेंची प्रतिक्रिया

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांच्या पुढाकाराने आज पुण्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी मराठा विचार मंथन बैठक पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले गैरहजर राहिले. यावेळी उदयनराजेंना तातडीचं काम आलं की आणलं गेलं माहिती नाही, अशी प्रतिक्रिया मेटे यांनी दिली.

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या पुढाकाराने आज पुण्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी मराठा विचार मंथन बैठक पार पडली. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी मराठा आरक्षण आंदोलनातील विविध नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांनाही वैयक्तिक आमंत्रण दिल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं. पण या नेत्यांपैकी कुणीही या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

नाशिक इथल्या छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीमधल्या राज्यस्तरीय मराठा समन्वयकांच्या बैठकीला विनायक मेटे उपस्थित राहिले नव्हते. ही बैठक त्यांची वैयक्तिक बैठक आहे असं सांगून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देखील या बैठकीला उपस्थित नव्हते.

या बैठकीमध्ये 25 ठराव मंजूर केले गेले. शासनाने 1 नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य नाही केल्या तर सर्व समाज रस्त्यावर येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसंच मराठा आरक्षणावरचा निर्णय होईपर्यंत एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्याचा ठरावही या बैठकीमध्ये पारित करण्यात आला.

EWS अंतर्गत जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यावं; आरक्षणाबद्दल संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांची वेगळी भूमिका

उदयनराजेंच्या अनुपस्थितीवर बोलताना विनायक मेटे म्हणाले की, “मेटे- उदयनराजेंना मी स्वत: आमंत्रण दिलं होतं. आज ते का आले नाहीत माहीती नाही. पण काही तातडीचं काम आलं किंवा आणलं गेलं माहिती नाही. पण पुढच्या आठवड्यात साताऱ्याला सगळ्या महत्त्वाच्या मराठा नेत्यांची मी बैठक आयोजित करणार आहे असं त्यांनी मला सांगितलं.”

माजी मंत्री राम शिंदे यांनाही उदयनराजे भेटले नाही धनगर आरक्षणाचा प्रश्न घेऊन आज पुण्यात माजी मंत्री राम शिंदे उदयनराजेंना भेटणार होते. मात्र, भेटण्यच्या ठिकाणापर्यंत येऊन उदयनराजे परत गेले. तातडीचं काम आल्यामुळे ही भेट पुढे ढकलल्याचा निरोप उदयनराजेंनी पाठवल्याचं स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिलं. धनगर आरक्षण्याच्या मुद्द्यावरुन उदयनराजेंची भेट घेणार होतो, असं राम शिंदे यांनी सांगितलं. बोलताना राम शिंदे म्हणाले की, “विरोधात असलं की जो तो धनगर आरक्षण देऊ म्हणतो आणि सत्तेत आलं की मात्र आरक्षण रखडतं” असं म्हणत भाजपला राम शिंदे यांनी एकप्रकारे घरचाच आहेर दिलाय. धनगर आरक्षणासाठी राजकारणापलिकडे विचार केला पाहीजे, असंही राम शिंदे यांनी सांगतिलं. उदयनराजे राम शिंदे यांना त्यांच्या एका परिचिताच्या घरी भेटायला येणार होते. मात्र, मीडियाची गाडी दिसल्यावर उदयनराजे अर्ध्या वाटेतूनच परत गेले. Vinayak Mete | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे बीडच्या तरुणाचा बळी, विनायक मेटेंची सरकारवर टीका

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget