UPSC Result : अभ्यास, व्यायाम, छंद जोपासला... समतोल राखत पिंपरीच्या तन्मयी देसाईची युपीएससी परीक्षेत बाजी
UPSC 2021 : तन्मयी गेल्या आठ महिन्यापासून फक्त स्पर्धा परीक्षांचाच अभ्यास करत होती. पण दहावीत असतानाच तीने आयएएस व्हायचं ध्येय बाळागलं होते.
UPSC 2021 : यूपीएससी 2021 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा यूपीएससी परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. युपीएससीचे निकाल लागलेत. यात पिंपरी चिंचवडच्या तन्मयी देसाईने ही बाजी मारली आहे. तन्मयीने देशात 224 वा क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या प्रयत्नात तीने हे यश संपादन केलंय. दिनचर्येंत फारसा काही बदल न करता, सर्व गोष्टींना प्राधान्य देत तन्मयीने या यशाला गवसानी घातली.
तन्मयी गेल्या आठ महिन्यापासून फक्त स्पर्धा परीक्षांचाच अभ्यास करत होती. पण दहावीत असतानाच तीने आयएएस व्हायचं ध्येय बाळागलं होते. मानसशास्त्रची पदवी घेतल्यानंतर, शिक्षक म्हणून नोकरी ही केली. या दरम्यान तन्मयीचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच होता. गेल्या वर्षी नोकरीला असतानाच पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली. मात्र यात ती अपयशी ठरली. मग तीने पुन्हा जोमाने तयारी केली अन् या वर्षीच्या परीक्षेला ही सामोरी गेली. त्यात पास होताच पुढच्या तयारीसाठी नोकरी सोडली.
9 मे ला तिची मुलाखत पार पडली. निकालाच्याच प्रतीक्षेत असताना सोमवारी दुपारी आनंदाची बातमी येऊन धडकली. कुटुंबात कोणाला विश्वास बसत नव्हता म्हणून प्रत्यक्षात वेबसाईटवर जाऊन स्वतः निकाल पाहिला, तेव्हा सर्वांना खात्री पटली. 224व्या नंबरावर तन्मयीचं नाव पाहताच कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही. एकमेकांना पेढे भरवत कुटुंबियांनी ही आनंदाची बातमी पै- पाहुण्यांना कळवली.
तन्मयीने या यशाला गवसनी घालण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. दिवसाची सुरुवात पहाटे साडे तीन वाजता करायची. मात्र सात ते आठ तासचं ती अभ्यासाला वेळ द्यायची. तर उर्वरित वेळेत व्यायाम, डान्स करत सर्व छंद जोपसायची. कुटुंबीय अन् मित्र मैत्रिणींशी मनमोकळ्या गप्पा मारायची पुरेशी झोप ही घ्यायची. असा सर्व समतोल राखत तन्मयीने आयपीएस होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं. तन्मयीने याचं सर्व श्रेय मार्गदर्शक इशान काब्रा आणि कुटुंबियांना दिले. आता सेवेत दाखल झाल्यावर समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचं तिचं ध्येय आहे.
तन्मयीच्या वडिलांचं निधन झालंय, ती आयएएस व्हावी अशी मोठी इच्छा त्यांचीच होती. ती पूर्ण झाल्याने तिच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झालाय. पहिल्या परीक्षेत अपयश आल्यानंतर दुसऱ्या परीक्षेच्या मध्यात तीने नोकरी सोडली. या कठीण काळात कुटुंबियांनी तन्मयीवर कोणतंही प्रेशर ठेवलं नाही. ती युपीएससी परीक्षेत यश मिळवेल असा ठाम विश्वास कुटुंबियांना होता अन तो तीने सार्थ ठरवला.
संबंधित बातम्या :
UPSC Success Story : रिक्षाचालकाच्या मुलाचा 'टॉप' गिअर, नाशिकच्या स्वप्नील पवारची यशोगाथा
UPSC Result : महाराष्ट्रातही मुलींची बाजी, प्रियंवदा म्हाडदळकर यूपीएससीमध्ये राज्यात पहिली