Pune-Mumbai Railway: पुणे मुंबईपासून येणार हाकेच्या अंतरावर; नवीन रेल्वे योजनेला रेल्वेमंत्र्यांची मंजुरी, प्रवास आणखी सुखकर होणार
Pune-Mumbai Railway: पुणे शहराचा वारसा आणि संस्कृती लक्षात घेऊन पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सांगितले. रविवारी बालेवाडी येथे पार पडलेल्या भाजप पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुण्यात आले आहेत.
पुणे : 160 वर्षांनंतर पहिल्यांच मोठे घाट आणि 28 बोगद्यांना बायपास करण्यासाठी मुंबई आणि पुणे (Pune Railway) दरम्यान नवीन रेल्वे योजना गेल्या आठवड्याच्या शेवटी मंजूर झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी मध्य रेल्वे विभागाला त्यावर जलदगतीने काम करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर लोणावळा येथे थांबलेल्या तीन डब्यांच्या विशेष ट्रेनमध्ये त्यांनी प्रवास केला आणि घाटांवर नेव्हिगेट करण्याच्या प्रक्रियेची आणि बँकर लोकोमोटिव्हच्या ऑपरेशनची तपासणी देखील केली. पुणे-मुंबई दरम्यान घाट मार्गावरील तीव्र चढण कमी करण्यात येईल. त्यामुळे बँकर जोडण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.
बँकर लोकोमोटिव्ह ही चालणारी इंजिने ट्रेनच्या मागच्या बाजूस जोडलेली असतात. जे चढाईच्या वेळी रेल्वेला ढकलतात आणि उताराच्या दरम्यान नियंत्रण गमावण्यापासून बचाव करतात. सध्या, मुंबई आणि पुणे (Pune Railway) दरम्यानच्या घाट विभागाचा ग्रेडियंट 1:37 आहे, ज्यामुळे गाड्यांना बँकर लोकोमोटिव्हची आवश्यकता असते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, आम्ही गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहोत, आणि मला वाटते की जो उपाय तयार केला गेला आहे तो अतिशय उपयुक्त आहे. त्याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे अशा अपेक्षा आहे. पुढे संपूर्ण योजनेचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करणे, त्याचे प्रकल्पात रूपांतर करणे आणि औपचारिक मंजुरीसाठी पाठवणे. ही एक लांबलचक प्रक्रिया आहे परंतु ही समस्येवर दीर्घकालीन उपाय ठरेल आणि पुणे-मुंबई या दोन्ही शहरांना जवळ आणेल,” असंही यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) म्हणाले.
शहराचा वारसा आणि संस्कृती लक्षात घेऊन पुणे रेल्वे (Pune Railway) स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी शनिवारी सांगितले. रविवारी बालेवाडी येथे पार पडलेल्या भाजप पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुण्यात आले आहेत. त्यांनी शनिवारी पुणे रेल्वे विभागाला भेट देऊन वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी केली.
"शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे. त्याचा पुनर्विकास करण्याची आमची योजना आहे. काम मात्र टप्प्याटप्प्याने होईल,” असंही ते पुढे म्हणाले. पुणे विभागाचे अधिकारी पुणे यार्डचे नूतनीकरण करण्याची योजना आखत होते, ज्यामध्ये प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचा समावेश होता. स्थानकावरील फलाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी याआधीच सांगितले होते.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यावेळी म्हणाले, पुणे-लोणावळा घाट (Pune Railway) आणि कसारा-इगतपुरी विभागाचा विकासही महत्त्वाचा आहे. या विभागांवरील गाड्या उतार, तीव्र वळण आणि उंचीच्या आव्हानांमध्ये चालतात. घाट विभागांचा ग्रेडियंट कसा कमी करायचा याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. हे दोन विभाग विकसित करण्याची योजना आहे. जेणेकरून गाड्यांची हालचाल सुरक्षित होईल आणि प्रवाशांना सुरक्षित वाटेल,” असंही ते पुढे म्हणाले.
प्रवासाच्या वेळेत कपात
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हाती घेतलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा मिसिंग लिंक प्रकल्प मे 2025 पर्यंत पुर्ण होईल. खोपोली एक्झिट ते सिंहगडापर्यंतच्या सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची लांबी संस्था सध्या 19 कि.मी. या नवीन मिसिंग लिंकच्या निर्मितीनंतर हे अंतर 13.3 किमी इतके कमी होईल. त्यामुळे मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वेची एकूण लांबी ६ किमीने कमी होणार आहे. प्रवासाचा वेळ 20-25 मिनिटांनी कमी होईल.
पुणे-लोणावळा 3री, 4थी लाईन
वैष्णव यांनी पुणे आणि लोणावळा (Pune Railway) दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन बांधण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली. सध्या, पुणे-लोणावळा विभाग हा 63.84 किमी लांबीचा दुहेरी मार्गाचा विद्युतीकरण मार्ग आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याविषयी या मार्गिका नक्की होतील. त्यांच्या उभारणीत राज्य सरकारचाही वाटा असतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं वैष्णव (Ashwini Vaishnaw) म्हणाले. ‘‘